वैशाली गायकवाड उपसंपादक पुणे
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- श्री. संत सावता महाराज समाधी सोहळ्यानिमित्याने श्री. संत सावता महाराज समाजभूषण पुरस्कार सोहळा 2023 चे आयोजन दिनांक 22 जुलै ला सकाळी 11.30 वाजता सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह समताभूमी लोहियानगर महात्मा फुले पेठ स्वारगेट पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पांडुरंगजी राऊत पुणे, संयोजक दशरथ कुळधरण हे असून के. एस. माळी सोलापूर यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रविकाका बोरवके, किरण झोडगे, विकास अण्णा रासकर, राजेंद्र आंडे, रामदास डोके, अभिनेत्री वैशाली धाकुलकर, अभिनेत्री अपूर्वा सोनार, डॉ. सुनिता शिंदे चित्रपट निर्मिती, विशाखा येवतकर, माधुरी खैरनार हे उपस्थित राहणार आहे.
संत सावता महाराज समाजभूषण पुरस्कार सोहळा 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, उद्योजक सह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या वर्षीचा श्री. संत सावता महाराज समाजभूषण पुरस्कार साताऱ्याचे आमदार जयकुमार गोरे यांना बहाल करण्यात येणार आहे.
सावित्रीबाई फुले पुरस्कार वैशाली महाजन शिक्षण मालेगाव, देवकी शिंदे उद्योजक मुंबई, भारती सातव शिक्षण पुणे, तनुजा जाधव सामाजिक औरंगाबाद, डॉ. पुष्पलता शिंदे, सामाजिक जुन्नर पुणे
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले दांपत्य पुरस्कार
डॉ. वसुधा कणे व डॉ. अजय कणे सातारा, डॉ. सुनिता शिंदे व संपत शिंदे औरंगाबाद, रवींद्र थोरात व सौ. वर्षा थोरात बारामती, जयकुमार चर्जन व शिला चर्जन परतवाडा अमरावती, सौ. मनीषा काटे व देवेंद्र काटे नागपुर,
महात्मा फुले पुरस्कार
संजय टिळेकर युवा उद्योजक, सासवड पुणे, विनोद पुंड उद्योजक नगर, शरद मंडलिक उद्योजक नाशिक, ॲड. मृणाल ढोलेपाटील सामाजिक पुणे, भिमराव कोथिंबीरे सामाजिक श्रीगोंदा, नगर,
श्री. संत सावता महाराज पुरस्कार
राजाभाऊ हडोळे अमरावती, डॉ. मिलिंद भडके पुणे, सुरेश माळी सांगोला सोलापूर, अरुण माळी एरंडोल जळगाव, अनंत बगाडे अकोला यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

