Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

सांगली: डॉ. बासाहेबांच्या नावाची कमान पाडल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी जनता लेकराबाळांसह मुंबई पर्यंत लाँग मार्च.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 22, 2023
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, सांगली
0 0
0
सांगली: डॉ. बासाहेबांच्या नावाची कमान पाडल्याच्या निषेधार्थ आंबेडकरी जनता लेकराबाळांसह मुंबई पर्यंत लाँग मार्च.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली : जिल्हातील मिरज तालुक्यातील बेडग गावात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची कमान ग्रामपंचायत कडून पाडण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण आंबेडकरी समाजात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी शासन आणि प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही म्हणून न्याय मागण्यासाठी बेडग गावातील आंबेडकरी समाजातील अनेक कुटुंब आपल्या मुलाबाळा सहित मुंबईच्या दिशेने कूच केली आहे.

जेव्हा राज्य शासनावर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आंबेडकरी जनतेमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकारने याची दखल घेऊन शासनाच्या निधीतून पडलेली कमान बांधून देण्यात येणार आणि कमान पाडणाऱ्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनकर्त्यांना दिली.

यावेळी त्यांनी मुंबईत मंत्रालयात शिष्टमंडळसमवेत चर्चा केली. बेडग येथील कमान पाडल्याच्या निषेधार्थ गावातील आंबेडकरी विचारांचे लोक लेकराबाळांसह गेल्या तीन दिवसांपासून मुंबईला चालत निघाले आहेत. त्यावर काल विधानसभेत चर्चा झाली.

त्यानंतर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि जनसुराज्य युवाशक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी आंदोलकांशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची व्हिडिओ कॉलव्दारे चर्चा घडवली. फडणवीस यांनी पाच जणांचे शिष्टमंडळ घेऊन चर्चेला यावे, अशी विनंती केली. समीत कदम यांनी आंदोलकांशी चर्चा करून आजची बैठक निश्चित केली.

डॉ. महेश कांबळे यांनी या विषयाची पार्श्वभूमी समजावून सांगितली. बेडगचे सरपंच उमेश पाटील यांनी मुद्दाम हा प्रकार केला असून पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील यांची त्यांना फूस आहे. त्यांनी प्रशासनावर दबाव टाकून कमान पाडायला लावली, अशी तक्रार त्यांनी केली. हा संपूर्ण विषय फडणवीस यांनी समजून घेतला. जे घडले ते चुकीचे आहे, दलित समाजावर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची पाडलेली कमान शासन पुन्हा बांधून देईल. त्याचवेळी ज्यांनी चुकीच्या पद्धतीने यात कार्यवाही केली आहे, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. पोलिस आणि जिल्हा प्रशासनाला तत्काळ तसे आदेश दिले. यावेळी आमदार विनय कोरे, पृथ्वीराज देशमुख, समित कदम, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, दिलीप राजूरकर, मिरजेचे उपअधीक्षक प्रणील गिल्डा, प्रांताधिकारी उत्तम दिघे, सचिन कांबळे, उमेश धेंडे आदी उपस्थित होते.

डॉ. महेश कांबळे म्हणाले, “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. शासनाने थोडी उशिरा का होईना दखल घेतली, मात्र दोषींवर गुन्हा दाखल करण्याचा शब्द दिला आहे. आम्ही गुन्हा दाखल होईपर्यंत लाँग मार्च सुरूच ठेवणार आहोत. शनिवारी सकाळी आठपर्यंत त्यांनी आमच्या हातात गुन्हा नोंदवल्याची कागदपत्रे द्यावीत.”

सुरेश खाडे यांना बैठकीतून बाहेर हकलले..
बेडग प्रश्नावरील बैठकीला पालकमंत्री तथा मिरजेचे आमदार सुरेश खाडे आले होते. त्यांच्या विषयीच आंदोलनकर्त्यांची मुख्य तक्रार असल्याने त्यांना या बैठकीला बसू दिले जाऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे फडणवीस यांनी पालकमंत्री खाडे यांना बाहेर थांबण्यास सांगितले. पालकमंत्री खाडे आणि खासदार संजय पाटील यांच्या पाठिंब्यामुळेच कमान पाडली गेली आणि त्यांचाच प्रशासनावर दबाव असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

पोलीस पाटील यांच्या अडीअडचणी संदर्भात पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मार्गदर्शन मेळावा संपन्न.

Next Post

बेडग गावातील लाँग मार्च काढणाऱ्या आंबेडकरी लोकांची तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी घेतली भेट.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बेडग गावातील लाँग मार्च काढणाऱ्या आंबेडकरी लोकांची तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी घेतली भेट.

बेडग गावातील लाँग मार्च काढणाऱ्या आंबेडकरी लोकांची तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी घेतली भेट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In