डॅनियल अँन्थोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी: ता.२१:- पोलीस पाटील यांना येणाऱ्या अडी अडचणी संदर्भात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली देहू गाव येथे पोलीस पाटील यांचा मार्गदर्शन मेळावा व कार्यशाळा कार्यक्रम संपन्न झाला. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात हद्दीतील ८० पोलीस पाटील या मेळाव्याला उपस्थित होते.
देहूरोड पोलीस स्टेशन अंतर्गत देहूगाव येथील संत तुकाराम मंगल कार्यालय येथे या एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
याप्रसंगी पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी पोलीस पाटील यांना येणारे अडीअडचणीसंदर्भात अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर धनवट, महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राजाध्यक्ष बाळासाहेब बाजीराव शिंदे पाटील, पुणे जिल्हा पोलीस पाटील संघाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव राळे पाटील, पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी पोलीस पाटील संघाच्या अध्यक्ष तृप्तीताई मांडेकर पाटील, खेड तालुका पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष अमोल पाचपुते पाटील, मावळ तालुका पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष लक्ष्मण शितोळे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक प्रमुख वक्ते व मार्गदर्शक डॉ.राम पठारे व राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी उपस्थित पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक निशांत करंडे पाटील यांनी केले ,तर सूत्रसंचालन अमोल पाचपुते पाटील यांनी केले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी उपस्थित पोलीस पाटील व मान्यावराचे आभार मानले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

