हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो.9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर दि. 23:- चंद्रपूर जिल्हातील जोरदार पाऊस पडल्यामुळे काही भागातील गावाचा मुख्यालयाशी संपर्क तुटला होता. या मुसळधार पाऊसामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे अनेक तालुक्यातील शेतकरी संकटात सापडलेल्या आहे. त्यामुळे काँग्रेस पार्टीच्या वतीने शेतीचे नुकसान बघता पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
बल्लारपूर विधानसभा मधील विसापूर गाव-हद्दीतील शेत-शिवार सत्त पडत असलेल्या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाले आहेत तसेच शेतकऱ्यांचे पीक पेरणी सुद्धा झाले असून त्यांच्या शेतजमणी हे पुरा खाली गेले आहेत हे पूर परिस्थिती लक्षात घेता विसापूर ग्रामपंचायत सदस्य मा.गजाननभाऊ पाटणकर यांनी सुचवलेल्या मार्गदर्शनात तात्काळ दखल घेत विसापूर गाव मधील बल्लारपूर विधानसभा सचिव प्रितम पाटणकर युवक काँग्रेस चंद्रपूर यांनी तात्काळ बल्लारपूरचे अजय नवकारकर तलाठी-पटवारी व निखील पिंपळशेंडे कृषी अधिकारी यांच्याशी फोन मार्फत संपर्क केले व चर्चा करून त्यांना विसापूर गाव-हद्दीला पूर परिस्थिती बद्दल माहिती देण्यात आली तसेच पटवारी व कृषी अधिकारी यांनी पूर उतरल्यानंतर सर्व शेतकऱ्यांचे शेत जमिनीचे पंचनामे होईल व नुकसान भरपाई देण्याचे प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

