पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे 24 जुलै:- पुणे शहर सोमवारी सकाळी एका खळबळजनक घटनेन हादळल आहे. एका मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांने आपल्या कुटुंबातील दोघांची निर्मुम हत्या केली त्यानंतर स्वत:ही आत्महत्या करून आपल्या सुखी संसाराची एका क्षणात दुर्दैवी अंत केला.
आपल्याच पत्नीची आणि आपल्या भावाचा मुलाची हत्या करून स्वतःही आत्महत्या केल्याची घटना समोर येताच पोलीस दलात खळबळ माजली झाली आहे. त्या पोलीस अधिकाऱ्याने हे कृत्य का केला? या प्रश्नाचे उत्तर पोलिसांना चौकशीनंतर मिळणार आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे. पुण्यातील बाणेर परिसरात ही घटना घडली.
नेमकी काय आहे घटना….
अमरावती पोलीस दलातील भरत गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे कुटुंब पुणे शहरात वास्तव्यास आहे. सोमावारी पहाटे चार वाजता त्यांनी पत्नीचा खून केला. त्यानंतर पुतण्यावर गोळी झाडली. या दोघांच्या खुनानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. मोनी गायकवाड वय 44 वर्ष ही भरत गायकवाड यांची पत्नी आहे तर दीपक गायकवाड वय 35 वर्ष हा त्यांचा पुतण्या आहे. घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.
अमरावतीला होते कार्यरत….
भरत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांचे कुटुंबीय गेल्या काही वर्षांपासून पुण्यात वास्तव्याला होते. नेमकी ही हत्या करण्याचे आणि त्यानंतर आत्महत्या का केली? घटनास्थळी त्यांनी काही चिठ्ठी लिहिली आहे का? या प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासानंतर मिळणार आहे.

