वैशाली गायकवाड, उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई/पुणे:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या निबंधक इंदिरा अस्वार यांची विभागीय चौकशी सुरू असताना आणि मॅट कोर्टाने त्यांना कार्यमुक्त करून पूर्वीच्या ठिकाणी पाठवावे अशी शासनास ऑर्डर काढलेली असतानाही शासकीय स्तरावरून त्यांची तिथून उचलबांगडी केली जात नाही. तसेच इंदिरा अस्वार यांनी बार्टीमध्ये मनमानी पध्दतीने काम करून अधिकाऱ्यांशी उध्दट वर्तन केल्याप्रकरणी व तत्कालीन महासंचालकांवर गंभीर आरोप केल्याप्रकरणी कार्यमुक्त केलेल्या धनश्री अवचरे यांची फेरनियुक्ती केली आहे. त्यामुळे धनश्री अवचरे यांच्यासह इंदिरा अस्वार यांना कार्यमुक्त केल्याशिवाय मुंबई येथील आझाद मैदानावरून उठणार नाही असा निर्धार आंदोलनकर्ते गौतम भंडारे, कविता गाडगे, शकुंतला शेलार व महानंदा डाळिंबे यांनी केला आहे.
बार्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार यांना कार्यमुक्त करण्यासाठी गौतम भंडारे यांनी पत्रकारमित्र सुनील ओवाळ यांना सोबत घेऊन दिनांक 8 जूनला पुणे येथील बार्टीसमोर व दिनांक 21 ते 23 जून असे तीन दिवस आझाद मैदान मुंबई येथे लाक्षणिक उपोषण केले होते. तरीही निबंधक इंदिरा अस्वार यांचेवर प्रशासनाने कसलीही कारवाई न करता त्यांची पाठराखण करण्याचेच काम केले. म्हणूनच बार्टीतील संबंधित अधिकाऱ्यांशी उध्दट वर्तन केल्याप्रकरणी व तत्कालीन महासंचालकांवर चुकीचे आरोप करून त्यांना बदनाम केल्याप्रकरणी महिला तक्रार निवारण समितीने कार्यवाही करुन काढून टाकलेल्या वादग्रस्त धनश्री अवचरे यांना पुन्हा इंदिरा अस्वार यांनी बेकायदेशीररित्या कामावर घेतले आले. त्यामुळे वादग्रस्त धनश्री अवचरे यांच्यासह निबंधक इंदिरा अस्वार यांना कार्यमुक्त करण्यासाठी दिनांक 20 जुलैपासून गौतम भंडारे यांनी तक्षशीला महिला मंडळाच्या अध्यक्षा कविता गाडगे, शकुंतला शेलार व महानंदा डाळिंबे यांना सोबत घेऊन मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलनास सुरूवात केली आहे.
अनुसुचित जाती आणि जमाती समाजाची सर्वांगीण उन्नती करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे सुरू असलेली एकमेव बार्टी ही संस्था आंबेडकरवाद्यांची अस्मिता आहे. मात्र या संस्थेत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करून व सनातनी विचार पेरून इंदिरा अस्वार यांनी बार्टीच्या ध्येय व धोरणांनाच सुरूंग लावण्याचे काम सुरू केले आहे. निबंधक इंदिरा अस्वार यांच्यावर माहिती अधिकार प्रकरणात खाडाखोड करणे, मुंबई उच्च न्यायालयात केसेस दाखल असतानाही आर्थिक हितसंबंध जोपासण्या साठी या संस्थांची प्रकरणे दाबून ठेवणे, व्हेंडरला नियमबाह्य कामे देणे, बार्टीच्या हिताच्या प्रकल्पांना जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवणे, प्रामाणिकपणे काम करणारे समतादूत, कर्मचारी, अधिकारी यांचा मानसिक छळ करणे, काही स्पर्धा परीक्षा केंद्रांना हाताशी धरून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या योजनांवर डल्ला मारणे, भीमा कोरेगांव भोजन प्रक्रियेत घोटाळा करणे, स्वतःच्या फायद्यासाठी शासननिर्णय विरूध्द पत्र निर्गमित करणे आदी आरोप आहेत. त्यामुळे स्वतःला आंबेडकरवादी म्हणविणाऱ्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी भ्रष्ट निबंधक इंदिरा अस्वार यांना बार्टीतून घालवून आपल्या या अस्मितेला वाचविण्यासाठी निःस्वार्थी पणाने पुढे आलेच पाहिजे. एक आंबेडकरवादी म्हणून या संस्थेला वाचविणे हे आमचे आद्य कर्तव्यच असल्याने सत्ताधाऱ्यांनी इंदिरा अस्वार यांना कितीही पाठीशी घालण्याचे काम केले तरी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही तेथून उठणार नाही असा निर्धार यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
यादरम्यान या आंदोलनकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने एससी समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठी कार्यरत असलेल्या बार्टी या संस्थेला बदनाम करुन संपविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या निबंधक इंदिरा अस्वार व पुन्हा बेकायदेशीररित्या कामावर रुजू करून घेतलेल्या धनश्री अवचरे यांना तात्काळ कार्यमुक्त करावे, शासनाने धनश्री अवचरे प्रकरणात चौकशी अहवाल मागविला असतानाही विहित प्रक्रिया न करता मागील कार्यकाळात काढून टाकलेल्या किंवा सोडून गेलेल्या वाईट कर्मचाऱ्यांना घेण्याची सुरु केलेल्या प्रकरणाची चौकशी करावी व शासनाच्या आदेशाशिवाय नवीन भरती करण्यास प्रतिबंध करावे, इंदिरा अस्वार यांच्यावर विभागीय चौकशी सुरू करण्यात दिरंगाई करणारे व इंदिरा अस्वार यांना मदत करणारे मंत्रालयातील अधिकारी यांची चौकशी करावी, मुंबई मॅट कोर्टाने इंदिरा अस्वार यांना शासन स्तरावरून काढून टाकण्याची प्रक्रिया करावी असे आदेश देऊनही त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नाही याची चौकशी करावी. तसेच इंदिरा अस्वार यांना कार्यमुक्त करुन मूळ विभागात परत पाठवावे, भीमा कोरेगाव कोर्ट प्रकरणाची नसती संदेहास्पद रित्या हाताळणाऱ्या एडवोकेट बनकर यांना काढून टाकले असताना पुन्हा त्यांना बार्टीत घेऊन भीमा कोरेगाव प्रकरण कमकुवत करणाऱ्या इंदिरा अस्वार यांची विभागीय चौकशी सुरू करावी. तसेच त्यांनी आजपर्यंत नियमबाह्यरित्या केलेली सर्व कामे याबद्दल अद्ययावत दोषारोपपत्र दाखल करण्यात यावे. तसेच एडव्होकेट बनकर यांना कार्यमुक्त करून विहित प्रक्रियेद्वारा दर्जेदार न्यायिक अधिकारी घ्यावेत, भीमा कोरेगाव न्यायिक प्रकरणात इंदिरा अस्वार यांनी केलेली कागदपत्रांची हानी याची तात्काळ चौकशी आयुक्त समाजकल्याण मार्फत करावी व इंदिरा अस्वार यांना या प्रकरणापासून तात्काळ दूर करावे, भीमा कोरेगाव भोजन घोटाळाप्रकरणी इंदिरा अस्वार यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी, समाजातील जबाबदार संघटना तक्षशिला महिला मंडळ यांनी इंदिरा अस्वार यांच्यावर केलेल्या अनेक गंभीर तक्रारींना केराची टोपली दाखविण्यात आली आहे त्या अत्यंत गंभीर तक्रारींची चौकशी करावी व केराची टोपली दाखविण्याऱ्यांवर कार्यवाही करावी आदी मागण्या केल्या आहेत. त्यामुळे या न्यायिक मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी समाज बांधवांनी आझाद मैदानावरील बेमुदत धरणे आंदोलनास पाठिंबा द्यावा असे आव्हान यावेळी करण्यात आले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

