पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- स्वारगेट पोलीस स्टेशन कडील गुन्हा रजिस्टर क्रमांक १९२/२०२३ भादवि क.३९७,३४ मधील आर्म ॲक्ट ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ मधील गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना, गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी पोलीस निरीक्षक नंदकुमार विडवई यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, यातील मुख्य आरोपी हे बँगलोर येथे गेलेले आहेत. लागलीच त्यांचा शोध घेणेकामी दोन टिम तयार करुन बँगलोर येथे रवाना केल्या. बंगलोर येथे सदर टिमनी आरोपींचा शोध घेवुन त्यांना बेंगलोर येथील चामरपेठ या परिसरातुन ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली करता आरोपींनी त्यांची नावे १) अभय कुमार सुभोद कुमार सिंग वय २३ वर्ष धंदा हमाली रा मार्कटयार्ड पुणे मुळ रा रामदिरी गाव बुगुसरा मटिहाणी ठाणा बिहार राज्य २) नितीश कुमार रमाकांत सिंग वय २२ वर्ष रा. सदर असे सांगितले. त्यांना सदर गुन्हयाच्या तपासकामी युनिट २, गुन्हे शाखा पुणे शहर येथे आणले असता त्यांचेकडे गुन्हयाच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्यांनी नमुद गुन्हयातील वापरलेले हत्यारे व हिसकावुन नेलेली रोख रक्कम पुण्यातील आंबेडकर नगर मार्केटयार्ड पुणे येथील राहत्या घरी ठेवलेली असल्याचे सांगितले. तसेच आमचा गुन्हयातील साथीदार मोहम्मद बिलाल तसुद हुसेन शेख वय २९ वर्ष हा रा आंबेडकर नगर, मार्केटयार्ड पुणे येथे असल्याचे सांगितले. अशी माहीती आरोपींकडुन प्राप्त होताच आंबेडकर नगर, मार्केटयार्ड पुणे येथे सपोनि वैशाली भोसले ०७ अंमलदार तसेच पोउपनि नितीन कांबळे, ०४ अंमलदार, पोउपनि राजेंद्र पाटोळे, ०४ अंमलदार अशा ०३ टिम आरोपींसह खाना झालो.

आंबेडकर नगर, मार्केटयार्ड पुणे या ठिकाणी वरिल टिमने आरोपी क्रं १) अभय कुमार सुभोद कुमार सिंग वय २३ वर्ष धंदा हमाली रा मार्कटयार्ड पुणे मुळ रा. रामदिरी गाव बुगुसरा मटिहाणी ठाणा बिहार राज्य २) नितीश कुमार रमाकांत सिंग वय २२ वर्ष रा. सदर यांचे राहते घरी जावुन पाहणी केली असता दोन्ही आरोपी हे एकाच खोलीत राहत असल्याचे आढळून आले. त्यांचेसमक्ष त्यांच्या राहत्या खोलीची तपासणी केली असता, तपासणी मध्ये आरोपी क्रं १ याच्या पिशवीत एक पिस्टल, २० जिवंत काडतुसे व त्याच्या वाटणीस आलेले दोन लाख रूपये असा मुद्देमाल मिळुन आला. तसेच आरोपी क्रं २ याच्या पिशवित त्याच्या वाटणीस आलेले १,२७,००० रूपये मिळुन आले. तसेच त्यांचा साथीदार आरोपी क्रं ३) मोहम्मद बिलाल तसुद हुसेन शेख वय २९ वर्ष हा रा आंबेडकर नगर, मार्केटयार्ड पुणे याच्या घरातुन १ गावठी कट्टा ११ जिवंत काडतुसे व त्याच्या वाटणीस आलेले २५,००० रुपये हस्तगत करण्यात आले. असा एकुण २ अग्निशस्त्र ३१ जिवंत काडतुसे व ३,५२,५०० रु. रोख रक्कम मुद्देमाल हस्तगत केला. नमुद आरोपीतांना स्वारगेट पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले असून पुढील अधिक तपास स्वारगेट पोलीस स्टेशन हे करीत आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, सहा.पो.आयुक्त गुन्हे, सुनिल तांबे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, नंदकुमार बिडवई गुन्हे शाखा युनिट-२, पुणे शहर, सपोनि वैशाली भोसले, पोउपनि नितीन कांबळे, पोउपनि राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार संजय जाधव, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, नामदेव रेणुसे, मोहसीन शेख, उत्तम तारु, राहुल राजपुरे, विनोद चव्हाण, साधना ताम्हाणे, विजय पवार, गणेश थोरात, अमोल सरडे, प्रमोद कोकणे, गजानन सोनुने, निखिल जाधव पुष्पेंद्र चव्हाण व नागनाथ राख यांनी केलेली आहे.

