हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- दिनांक १९ जुलै २०२३ रोजी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी शिष्टमंडळासह रामपूर ग्रामपंचायतचा समावेश राजुरा नगरपरिषद मध्ये करण्यात यावा यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे मार्गदर्शनात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले. निवेदन देतानाची ही पोस्ट विविध व्हाट्सअप ग्रुप वर टाकन्यात आली. या पोष्टवर राजुरा येथील राजू डोहे यांनी माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या विरोधात अपमानास्पद व अशोभनीय मेसेज लिहून बदनामी केली. विनाकारण बदनामी करणाऱ्या दुषप्रवृत्त्तीच्या व्यक्तीची चौकशी करून गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी, अशा प्रकारची तक्रार माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी भाजप पदाधिकारी, कर्यकर्ते व शेकडो समर्थकांसह राजुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल नागरगोजे यांना दिली. यात डोहे यांनी केलेले आरोप सिध्द करण्याचे आवाहन सुध्दा निमकर यांनी तक्रारीत केले आहे. या तक्रारीची त्वरीत चौकशी करुन कारवाई कारण्यात येईल असे पोलीस निरीक्षक नागरगोजे यांनी सांगीतले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सतीश धोटे, अरुण मस्की, मिलिंद देशकर, वाघुजी गेडाम, राधेश्याम अडाणीया, दिलीप वांढरे, महादेव तपासे, सहजादअली, संजय पावडे, हरिदास झाडे, संदीप गायकवाड, प्रदिप बोबडे, बाळनाथ वडस्कर, रत्नाकर पायपरे, नामदेव गौरकर, भीमराव पाला, प्रकाश फुटाणे, राजकुमार भोगा, प्रदीप पाला, तूलाराम गेडाम, जनार्धन निकोडे, राहुल साळवे, नवनाथ पिंगे, संजय जयपूरकर, सुरेंद्र वेलादे, वंदना गौरकार, संध्या हरिहर, रूपवती जेटमल, मीना वांढरे, राधा तोगर, उषा करमणकर, संतोषी निमकर, कोमल काटम, वंदना पिदुरकर, यांचे सह शेकडो कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

