सागर शिंदे वाशिम जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- जिल्ह्यात 24 जुलै रोजी सकाळी 10 वाजतापर्यंत मागील 24 तासात सरासरी 19.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 1 जून 2023 पासून जिल्ह्यात आजपर्यंत एकुण 403.1 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
24 जुलै रोजी सकाळी गेल्या 24 तासात पडलेला पाऊस तालुकानिहाय पुढील प्रमाणे आहे. कंसात दिलेली पाऊसाची आकडेवारी ही यावर्षीच्या 1 जून 2023 पासूनची आहे.वाशिम तालुका – 22 मिमी,( 323.8 ),रिसोड तालुका – 17.6 मिमी (337.6), मालेगाव तालुका – 39 मिमी (428.2), मंगरूळपीर तालुका – 11 मिमी (494.5), मानोरा तालुका -9.2 मिमी (396) आणि कारंजा तालुका – 11.8 (459.1) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.मागील वर्षी 24 जुलैपर्यंत जिल्ह्यात 441.3 मिमि पाऊस पडल्याची नोंद आहे.

