संदिप सुरडकर, नागपूर जिल्हा प्रातिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज! ऑनलाईन नागपूर:- राज्याच्या उपराजधानी असलेल्या नागपुरात डेंग्यू ने कहर केला आहे. महिन्याभरातील आकडे थक्क करणारे आहे. त्यामुळे डेंग्यूने चांगलेच पाय पसरवले असल्याचे दिसून येत आहे.
नागपुर येथे 1 जानेवारी ते 24 जुलै 2023 पर्यंतच्या काळात डेंग्यूचे तब्बल 61 रुग्ण आढळले असून त्यापैकी निम्म्याहून जास्त रुग्ण हे मागील महिन्याभरातील आहेत. डेंग्यूचे रुग्ण शहरात वाढत असल्याने आता नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागावर त्यावर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आवाहन आहे.
नागपूर शहरातील विजयनगर भागात डेंग्युसदूष आजाराने एका रुग्णाच्या मुर्त्यू झाला होता. परंतु, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून 36 संशयित्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 3 रुग्णाना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले. नवीन रुग्णमध्ये दोन 14वर्षीय मुलासह एका 28 वर्षीय व्यक्तीचाही समावेश आहे. त्यातच नागपूर शहरात आजपर्यंत आढळलेल्या 61पैकी निम्म्याहून जास्ता रुग्ण गेल्या महिन्याभारतील आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहराच्या वेगवेगळ्या भागात कीटकनाशक फवारणीसह डेंग्यू आजाराबाबद जनजागृती सुरु करण्यात आली आहे.
डेंग्यूचे लक्षण दिसताच ताटळीने उपचार घेण्याचे आव्हान नागरिकांना करण्यात आले आहे.दरम्यान, शहरात एवढे रुग्ण आढळल्याचा वृतला महापालिकेच्या अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला. शहरातील बऱ्याच रिकाम्या भूखंडावर पानी सचल्याने डासांची संख्या वाढली आहे. तर दुसरीकडे शहरातील अनेक घरातील कुलर आधापाही काढण्यात आले नाहीत. त्यामुळे या कुलरच्या पाण्यातही डासांची संख्या वाढल्याचे निरीक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नॉनवण्यात आले आहे. महापालिकेकडून डेंग्यू नियंत्रणासाठी सर्वेक्षणाच्या कामाला गती देण्यात आली आहे.

