मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.२६जुलै:- हिंगणघाट शिवसेने (ठाकरे) च्या वतीने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील तालुका प्रमुख सतीश धोबे, शहर प्रमुख सतीश ढोमणे, तथा उप तालुकाप्रमुख प्रकाश अनासाने, शहर संघटक मनोज मिसाळ व गजानन काटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनियुक्त पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांची पक्षातर्फे सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ भेट देण्यात आला. त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी नव्याने पदभार स्वीकारलेला पोलीस निरीक्षक मारुती मुळूक यांना हिंगणघाट येथील भौगोलिक स्थिती व इतर माहिती सुपूर्त करण्यात आली. यावेळी शिवसेना पक्षातील नगरसेवक मनीष देवडे, बंटी वाघमारे, विभागप्रमुख रुपेश कटकर, मोहन तुमराम, सचिन मुळे, उपशहर प्रमुख संजय पिंपळकर, हिरामण आवारी, दिनेश धोबे, अनंता गलांडे, धोटे सर, नितीन वैद्य, युवा सेना शहर प्रमुख भूषण कापकर, सिद्धार्थ गजभिये, गौरव मकोडे, संतोष कोहड, हजारे सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

