मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- ‘भाग्यश्री शिशु’ योजनेअंतर्गत बुधवारी 26 जुलै रोजी स्तनदा माता व नवजात बाळांना पोषक आहारचे किट वाटप करण्यात आले.
8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते अहेरी येथील उप जिल्हा रुग्णालयातून ‘भाग्यश्री शिशु’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. त्या अनुषंगाने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून दर बुधवार ला स्तनदा माता व नवजात बाळाला पोषक आहार असलेले कीट वाटप करण्यात येत आहे.
26 जुलै रोजी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्यांनी किट वाटप करून गरोदर मातांची आस्थेने विचारपूस केले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे अहेरी तालुका अध्यक्ष सारिका गडपल्लीवार, शहर अध्यक्ष सुवर्णा पुसालवार, सरिता पारेल्लीवार, श्यामला बेझंकीवार, रजिता पारेल्लीवार आदी महिला उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

