पंकेश जाधव, पुणे ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुणे शहरात काही दिवसा अगोदर मोठी कारवाई करत दीड वर्षांपासून शहरात राहत असलेल्या मोस्ट वॉटेंड दोन दहशतवादयाना बेड्या ठोकल्या होत्या. या कारवाई दरम्यान त्यांच्याकडे संशयास्पद वस्तू पोलिसाना मिळून आल्या. या दोघांचा संबंध जयपुरात सीरियल ब्लास्टशी असल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच एनआयएने त्यांच्यांवर पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. हे दोघे दीड वर्षांपासून पुण्यात राहत असतानाही पोलिसांना त्याचा थांगपत्ता नव्हता. या प्रकारानंतर घर किरायाने देणाऱ्या घर मालकानंसाठी पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.
एजंटची कोंढवा पोलीस स्टेशन येथे मीटिंग..
आज मालमत्ता भाड्याने देणाऱ्या एजंटची कोंढवा पोलीस स्टेशन येथे मीटिंग घेऊन त्यांना दिलेल्या भाडेकरू ची माहिती दिलेल्या नमुना फॉर्म त्याच्यासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्टची झेरॉक्स तसेच रजिस्टर भाडेकरारनामा इत्यादी कागदपत्र पोलीस स्टेशन येथे जमा करण्याबाबत सूचना देण्यात आलेले आहे. तसेच पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ठीक ठिकाणी बॅनर लावण्यासाठी तसेच पॅम्प्लेट लावण्यासाठी वाटप करण्यात आलेले आहेत तसेच बॅनर तसे पॅम्प्लेट पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ठीक ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. आम्ही खबरदारी घेत आहोत शहरात कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून सर्वांनी यात सहयोग्य करावा अशी माहिती संतोष सोनवणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन पुणे यांनी महाराष्ट्र संदेश न्युज बरोबर बोलताना दिली.
पोलिसांनी काय घेतला निर्णय…
पुणे शहरात दोन मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मिळून आल्याने पुणे पोलीस अलर्ट मोडवर आहे. घर मालकाशी भाडेकरार न करता हे दोन्ही दहशतवादी कोंढवा भागात भाडेतत्वावर राहत असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. आपले घर किरायाने देण्याआगोदर घरमालकाने भाडेकरूची माहिती पोलीस स्टेशन येथे सादर करणे सक्तीचे केले आहे. तसे न केल्यास घर मालकावर गुन्हा दाखल होणार आहे.
पुणे पोलीसांचा सोसायटीला सूचना…
यावेळी पुणे पोलिसांनी पुणे शहरातील सर्व सोसायटीना काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. सोसायटीचे अध्यक्ष, सचिव यांनी पोलीस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय भाडेकरुला सोसायटीमध्ये प्रवेश देऊ नये, असे स्पष्ट आदेश दिले आहे. तसेच ऑनलाइन भाडेकरुचे व्हेरिफिकेशन केल्यास त्याची एक कॉपी पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक केले आहे.
यासंदर्भातील परिपत्रक पुणे पोलिसांनी जारी केले आहे.

