✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्ह्यातील सर्पदंश रुग्णांना वाचवण्याचा हेतूने निसर्गसाथी फाऊंडेशन हिंगणघाट तर्फे निवेदन देऊन मागणी करण्यात आली. पण त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे आंदोलनाचा इशारा देण्यात आला त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निसर्गसाथी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांना कॉल करून मीटिंग करिता स्वतः बोलावले त्याप्रमाणे ते गेलो असता जिल्हाधिकारी कर्डिले यांची भेट घेतली. त्यांची अजित पवार यांचे सोबत व्हिडिओ कॉन्फरेन्सीग द्वारा मीटिंग होती म्हणून त्यांनी यांना श्री. घुगे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचे सोबत मीटिंग मधे चर्चा करायला सांगितले.
त्याप्रमाणे निसर्गसाथी फाऊंडेशन हिंगणघाटचे सर्व कार्यकर्ते जिल्हा परिषदला गेलो तिथे घुगे, डॉ. तडस सिव्हिल सर्जन, डॉ. परडकर आरोग्य अधिकारी यांचे सोबत चर्चा झाली त्यात त्यांनी जिल्हातील डॉक्टर यांना स्नेक बाईट मॅनेजमेंट या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्याचे व इतर मागण्या सुध्दा मान्य केल्या. सर्पदंश उपचार या विषयावर जिल्ह्यातील डॉक्टरांची कार्यशाळा आयोजित केल्यामुळे जिल्ह्यातील डॉक्टरांमध्ये उपचार करण्याचा आत्मविश्वास निर्माण होईल तसेच स्नेक बाईट मॅनेजमेंट ची त्यांना माहिती मिळेल त्यामुळे कोणत्याही रुग्णाला रेफर केल्या जाणार नाही त्यांना जागेवर उपचार मिळेल. त्यामुळे सर्पदंश रुग्णांचा वेळ वाचेल त्यांच्यावर यशस्वी उपचार होईल.
वर्धा जिल्ह्यात साधारणतः 15 ते 20 लोकांचा मृत्यू दरवर्षी सर्पदंशामुळे होतो यातील बहतांश रुग्ण वाचतील जिल्ह्यात अनेक सर्पमित्र आहे. कुणालाही स्नेक् बाईट कार्यशाळेची मागणी रेटता आली नाही. या मुळे सामान्य गरीब, मजूर, आदिवासी वंचित लोकांचे प्राण वाचले हे नक्की . या बैठकीसाठी नागपूर चंद्रपूर वर्धा येथील सर्पमित्र उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

