हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- श्री. राजू किसनराव वानखेडे सहायक शिक्षक जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023 साठी चंद्रपूर जिल्ह्यातून निवड करून राज्य पातळीवर पाठवण्यात आले आहे. दिनांक: 24 जुलै रोजी चंद्रपूर डायट मध्ये झालेल्या मुलाखतीत जिल्हा निवड समितीने त्यांचे नाव राज्यपातळीवर पाठवीले आहे. याबाबत डाॅ. अशोकराव जीवतोडे सचिव चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपुर, श्री. बी. बी. भगत मुख्याध्यापक तथा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व पालक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.
याबाबत श्री. राजू वानखेडे यांनी जिल्हा निवड समितीचे कल्पना चव्हाण मॅडम माध्यमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, राजकुमार हिवारे प्राथमिक शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, ना. गो. थुटे यांचे आभार व्यक्त केले आहे.

