अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी 8956647004
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विदर्भ:- अमरावती शहरांमध्ये अनेक वर्षापासून भाड्याने राहणाऱ्या नागरिकांचा सरकार किंवा निवडून दिलेले लोकप्रतिनिधी कधीच विचार करत नाही 200 ते 300 रुपये रोजाने जाणाऱ्या नागरिकांना चार ते पाच हजार रुपये महिन्यासाठी भाडे द्यावे लागते ते आपला उदरनिर्वाह कोणत्या पद्धतीने व कोणत्या अडचणी मध्ये करत आहे याचा शासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी कधीच विचार केलेला नाही हा विचार घेऊन वंचित बहुजन आघाडीने 23 जूनला तहसीलदार यांना विनंती केली होती.
त्यात असे म्हटले की अमरावती शहरांमध्ये भूमाफियांनी ज्या जागेवर 40 वर्षापासून अतिक्रमण केलेले आहे ते जागा खाली करून अमरावती शहरातील भाडेकरूना उपलब्ध करून घ्यावी मात्र तहसीलदार यांनी आतापर्यंत भाडेकरूच्या प्रश्नावर कोणत्याच प्रकारचे उत्तर सुद्धा दिलेले नाही यावरून पडते की प्रशासनाला भाडेकरूंची किंमत नाही जर अमरावती शहरातील शासनाने भाडेकरूना जागा उपलब्ध करून दिली नाही तर ज्या प्रकारे चाळीस वर्षापासून अमरावती शहरातील भूमाफी यांनी शासनाच्या जागेवर कब्जा करून करोडो रुपये कमावले आहे त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही मात्र आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अमरावती शहरातील शासनाच्या जागेवर अमरावती शहरातील दहा हजार भाडे करून ना अतिक्रमण करून जागा उपलब्ध करून देऊ त्याकरिता एक ऑगस्टला वंचित बहुजन आघाडीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चामध्ये अमरावती शहरातील संपूर्ण भाडे करून ने मोठ्या ताकतीने सामील व्हावे असे आवाहन रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे वंचित बहुजन आघाडी अमरावती शहर यांनी प्रसिद्धी पत्रकार दिली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

