मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 26 जुलै बुधवार पासून सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पावसाने कहरच केला आहे. बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे मुख्य मार्गावरील पंजाब नॅशनल बँकेच्या समोर असलेल्या माहेश्वरी मॅचिंग, माहेश्वरी एन एक्स, माहेश्वरी क्लास स्टोअर्स या दुकानात नालाचे पाणी शिरल्याने त्या दुकानाच्या आत गुडघाभर पाणी जमा झाले. त्यामुळे दुकानात ठेवलेले महागडे कापड, कापड बॉक्स खाली ठेवलेले कपड्याचे वेगवेगळे साहित्य सर्व पाण्यामुळे ओले झाल्याने जवळपास 15 लाख रुपयांचा नुकसान झाल्याचे दुकान संचालक यांनी सांगितले.
विशेष म्हणजे या परिसरात नगरपरिषदने बांधलेली नाली आहे परंतु ती त्या नालिवर पाणी निघण्याचे ठिकाण नसल्याने संपूर्ण परिसर रात्रीला जलमय झाला होता. त्यातही रात्री विद्युत पुरवठा बंद झाल्याने अनेक अडचणी उद्धवल्या दुकानात पाणी शिरल्याची माहिती त्या परिसरात उपस्थित एका व्यक्तीने दिली. त्या आधारावर दुकानाचे संचालक बुधवारला रात्रीला दुकानात पोहोचले. पाण्याची वेडा पाहून ते चकराऊन गेले आपले नातेवाईकाच्या मदतीने जितके होत होते तितके पाणी बाहेर काढण्याची प्रयत्न केले. परंतु पाऊस सुरूच असल्याने ते असाहाय्य झाले.
एकशे वीस फूट लांबीच्या या दुकानात माहेश्वरी एन एक्स, माहेश्वरी मॅचिंग, माहेश्वरी क्लाथ स्टोअर्स हे दुकाने आहे. पाणी जास्त वेळ आत मध्ये राहिल्याने संपूर्ण महागडे कपडे पाण्यात सापडल्याने ते पिवळे पडले. विशेष म्हणजे सामोर सणाचे दिवस असल्याने दुकान संचालकाने मुंबई, अहमदाबाद, सुरत येथून मोठ्या प्रमाणावर कापडाचा नवीन स्टॉक आणला होता. या संबंधात दुकान संचालक रोहित राठी, विजय राठी यांनी शहरातील महसूल प्रशासनाला या संबंधात सूचना केली आहे. जवळपास पंधरा लाखाच्या वर किमतीचे कपडे खराब झाल्याचे प्राथमिक दृष्ट्या निदर्शनास आले आहे. वृत्तलेपर्यंत महसूल प्रशासनाचा पंचनामा रिपोर्ट घटनास्थळी जाऊन बनविण्याचा काम सुरू होता.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

