हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- संजय गांधी निराधार योजना शासन मार्फत राबवली जात असते. या समितीची पहीली बैठक समीर केने यांच्या अध्यक्षा व तहसिलदार सौ. कंचन जगताप यांचा प्रमुख उपस्थिति मध्ये स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालय, बल्लारपूर येथील सभागृहात संपन्न झाली. यावेळी या योजनेच्या 60 लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. या अर्जात अपंग, निराधार, विधवा, श्रावण बाळ इत्यादि प्रवर्गातील लाभार्थ्यांचा समावेश होता. यावेळी सौ. कंचन जगताप तहसीलदार बल्लारपुर यांच्याकडून नवनियुक्त संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष समीर केने यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. आणि सर्व नवनियुक्त सदस्याचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने नायब तहसीलदार सतीश सालवे व संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य सतीश कनकम, रमेश पिपरे, रुमदेव डेरकर, मल्लेश कोडारी, राजेश दासरवार, किशोर मोहुर्ले, अनिल मोरे, वैशाली जोशी इत्यादि उपस्थित होते.
काय आहे योजना कोणाला लाभ मिळतो…. या योजनेतंर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह ), घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी, 35 वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो. या योजनेमध्ये दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये 21,000/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

