राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
मो नंबर 9518368177
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- तालुक्यातील पहिले खनिज विकास निधी अंतर्गत मौजा धाबा, तह गोंडपिपरी येथे पिण्याचे पाणी जल शुद्धीकरण संयंत्राचे लोकार्पण सोहळा शुक्रवार दिनांक 28 जुलै ला संपन्न झाला. याचे उदघाटक म्हणून वैष्णवीताई अमर बोडलावार माजी जि प सदस्या अध्यक्षा, नंदाताई घोगरे सरपंच ग्रामपंचायत धाबा सहअध्यक्ष हिराचंद बंडुजी कंदिकूरवार उपसरपंच ग्राम पंचायत धाबा हे होते.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून अमर मोहनराव बोडलावार माजी जि प सदस्य चंद्रपूर यावेळी खुशाल बोन्डे, बबन निकोडे भाजपा तालुका अध्यक्ष, स्वप्निल अनमूलवार उपसभापती कृ उ बा समिती गोंडपिपरी, अरुण कोडापे माजी उपसभापती पं स गोंडपिपरी, दिपक बोनगीरवार, चौधरी गुरुजी संचालक कृ उ स गोंडपिपरी, सौ रोशनी अनमूलवार माजी सरपंच ग्रा पं धाबा, सौ नीलिमा कंदिकूरवार सदस्य ग्रा पं धाबा, सौ लक्ष्मी बालुगवार सरपंच ग्रा पं भं.तळोधी, हरीश घोगरे, विठ्ठल चनकापुरे, निखिल चंदनगिरीवार, सुरज फरकडे, किशोर झाडे, गफ्फार शेख सर्व सदस्य ग्रामपंचायत धाबा व संत नागरितील ग्रामस्थ उपस्थित होती.

