ग्रामपंचायत सदस्य सलय्या कंबलवार यांचा थेट ग्रामपंचायतवर आरोप
मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- पंचायत समिति अंतर्गत देवलमरी ग्रामपंचायत हद्दीत मोसम गाव येतो हा गाव अहेरी पासून ते 18 किलोमीटर दूर सिरोंचा रोडावर असलेल्य गाव येथील कुठूंब संख्या 150 च्या वर असून देवलमरी ग्रामपंचायत अंतर्गत प्रभाग क्रमांक 4 मध्ये मोसम आणि नंदिगाव येतो या प्रभागत उपसरपंच आणि दोन सदस्य आहेत प्रत्येक ग्रामसभा मध्ये प्रत्येक वेळी समस्या सांगूनही गावाकड़े पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळेना ही स्थिति निर्माण झाली आहे. काही विहीरी मध्ये तर पावसाळा सुरू झाला तेव्हा पासून एकही वेळी साधी बिल्चिंग पावडर सुद्ध टाकण्यास ग्रामपंचायत देवलमरीकडे पैसे नाही आणि हातपंम्प मध्ये नालीचे दूषित पाणी शिरल्याने पाणी पिण्यास आरोग्यासाठी हानिकारक झाले आहे. ही बाब देवलमरी ग्रामपंचायतचे सचिव आणि सरपंच यांना वारंवार सूचना सांगुनही याच्या तोडगा काढण्यास देवलमरी ग्रामपंचायत असमर्थ ठरत आहे.
मोसम गावातील लोकांना पिण्यास स्वच्छ पाणी मिळणार का नाही असे प्रश्न निर्माण झाले आहे, मागिल 10 वर्ष हा ग्रामपंचायत आविस च्या ताब्यात होता आता राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या ताब्यात आहे. आता तरी या प्रभागाचे काही विकास होईल का ? असा प्रश्न ग्राम पंचायत सदस्य शालय्या कंबलंवार आणि मोसम गावातील नागरिकांनी म्हटले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

