आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज /ऑनलाईन वर्धा:- सर्पदंशाने झालेले मृत्यू योग्य उपचार न मिळाल्याने झाल्याचा आरोप करीत निसर्गसाठी या स्वयंसेवी संस्थेने रस्ता रोको आंदोलनची घोषणा केली होती. मात्र त्याची वेळीच दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संस्थेचे प्रवीण कडू, सर्पमित्र प्रवीण चरदे, शुभम जळगावकर, श्रीपाद बाकरे, शैलेश पारेकर, नितेश भांदक्कर, नागपूरच्या वर्ल्ड लाईफ संस्थेचे गौरांग वाईकर तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित घुगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पराडकर यांच्या संयुक्त बैठकीत चर्चा केली.
यावेळी डॉक्टरांसाठी कार्यशाळा घेऊन सर्पदंश व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन होणार. प्रत्येक रुग्णालयात सर्पदंश रुग्णासाठी एक बेड राखीव, दक्षता समिती, रुग्णांना अन्यत्र पाठविणे टाळणे, शून्य मृत्यूसाठी प्रयत्न करणे, या बाबी मान्य झाल्यात.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

