रत्नु कांबळे, कोकण ब्यूरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिंधुदुर्ग:- कुडाळ तालुक्यातील शिवापुर येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे गुरे चरायला घेवून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला. तुकाराम राऊळ वय 50 वर्ष असे मृताचे नाव आहे. या घटनेने कुडाळ तालुक्यातील शिवापुरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत. कुडाळ तालुक्यातील शिवापुर येथील शेतकरी तुकाराम राऊळ हे काल, बुधवारी दि 26 जुलै रोजी घरातून सायंकाळी गुरे चरायला घेवून गेले होते. बराच उशिर झाला पण ते घरी परतले नाहीत. यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र त्यांचा शोध लागला नाही. दरम्यान, आज पुन्हा त्यांचा शोध घेतला असता सकाळच्या सुमारास नदीच्या पाण्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला? यामागे घातपात असू शकतो का यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

