पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626
दिघी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज!ऑनलाईन पुणे :- दिघी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 292 /2023 भां.द. वी. 392,34. मधील फिर्यादी संदीप विश्वास मराठे वय 36 वर्षे धंदा.नोकरी राहणार ये 1002 इमेजिका पार्क सोसायटी चिखली तालुका हवेली जिल्हा पुणे यांनी दिनांक 07.07. 2023 रोजी दिघी पोलीस ठाणे येथे तक्रार दिली की ता.05.07.2023 रोजी रात्रौ 12 वाजून 40 वाजण्याच्या सुमारास हे त्यांचे कडील मोटरसायकल वरून राहत्या घराकडे जात असताना वडमुखवाडी चौकाच्या पुढे दिघी आळंदी रोड तालुका हवेली जिल्हा पुणे या ठिकाणी एक नारंगी व एक काळा रंगाची अशा दोन केटीएम ड्युक मोटरसायकल वरील चार चोरट्यांनी फिर्यादी यांना अडवून त्यांच्या कमरेला दोघांनी चाकू लावून दोघांनी खिशातील 4000/- रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल जबरदस्तीने काढून तसेच खिशातील पाकीट त्यामध्ये कागदपत्रे असे जबरदस्तीने चोरून घेऊन गेली अशी तक्रार दिल्याने वर नमूद प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदरचा गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपीचा शोध घेण्याबाबत वरिष्ठांनी आदेशित केले होते.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील भदाने व तपास पथकातील अंमलदार तपास करत असताना घटनास्थळावरील तसेच आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता कुठेही दोन केटीएम गाड्या एका मागून एक गेलेचे दिसत नव्हती. तसेच आरोपी बाबत कुठलेही माहिती प्राप्त झाली नव्हती. तसेच फिर्यादी यांनी जाणून बुजून त्यांच्याकडील आयएमइआय क्रमांक दिला नव्हता. पोलीस उपनिरीक्षक भदाने यांनी फिर्यादी यांनी दिलेल्या मोबाईल नंबर चे तांत्रिक विश्लेषण केले असता सदरचा मोबाईल फिर्यादी हेच वापरत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने फिर्यादी यांना तपास कामी पोलीस ठाणे येथे बोलवले होते. फिर्यादी यांच्याकडे तपास केला असता त्यांनी ते 13 तास ड्युटी करतात तसेच त्यांना ड्युटी करता कंपनी कोणीही मदतीस माणूस देत नव्हती. त्यांचे ड्युटीचा टाइमिंग जास्त त्यांनी त्यांच्या ड्युटीच्या टाइमिंग कमी व्हावा व रात्रपाळी ड्युटी देण्यात येऊ नये याकरिता फिर्यादी यांनी खोटी तक्रार दिल्याची तपासात सांगितले तसेच खरेदी यांच्याकडून चार हजार रुपये किमतीचा एक रेडमी नाईन कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरोधात खोटी तक्रार दिल्याने पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत. सदरची कारवाई ही दिघी तपास पथकाने केलेली आहे…

