जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन याप्रसंगी विद्यार्थी उपस्थिती.
✍️अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी:- येथील सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक सदस्य व उपाध्यक्ष सहदेवराव भगत होते तर प्रमुख अतिथी म्हणून सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयाचे कार्यकारणी मंडळातील रामदासजी नाखले व सौ श.र.दहाट, ग्रंथपाल सुरेश भिवगडे व मार्गदर्शक म्हणून बार्टीचे आर्वी तालुका समतादुत श्री. परतेकी उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहदेवराव भगत यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर विचार व्यक्त करत असताना सांगितले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे भारतातील एक समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. लोकशाहिर अण्णाभाऊ साठे हे अस्पृश्य समाजात जन्मले तरी त्यांची ओळख हि त्यांच्या लेखन व त्यांच्या कार्यावरून होते. साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी मोझॅक होते, सुरुवातीला कम्युनिस्टांनी प्रभावित केले होते परंतु नंतर ते आंबेडकरवादी बनले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली.
अण्णाभाऊ साठे यांचे खर नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे एक लेखक, साहित्यरत्न लोकशाहीर तसेच समाजसुधारक म्हणुन ओळखले जातात. त्यांनी अनेक लोकनाटये, प्रवासवर्णन, कथा, कादंबरी, नाटक, शाहीरी, पोवाडे, पटकथा यांचे देखील लेखन केलेले आपणास दिसुन येते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल सुरेश भिवगडे यांनी तर आभार निखिल वाघमारे यांनी मानले. या कार्यक्रमाला राजेश तायवाडे आकाश वलके ई. विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

