रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतुर:- तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांना उत आला आहे. त्यामुळे रिपब्लिक सेना आक्रमक झाली आहे. तालुक्यातील अवैध धंदे बंद करा नाही तर आंदोलन छेळू अशा इशारा रिपब्लिक सेनाच्या वतीने दिनांक. 1 ऑगस्ट रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदनाद्वारा म्हटलं आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, परतूर शहरासह ग्रामीण भागामध्ये गुटखा, मटका, अवैध दारू विक्री व रेती सर्रास पणे चालु असुन यामुळे तरूण पीढी उध्दवस्त होत आहे. तसेच सट्टा मटका सारख्या जुगारानी अनेक नवीन पिढीचे संसार उध्दवस्त होत असुन सट्टा मटाक्या सारखा अवैध धंदा आता नविन ऑलाईन पध्दतीनी मोबाईल द्वारे खेळविल्या जात आहे. तसेच परतूर शहरासह ग्रामीण भागामध्ये देशी दारू, मटका हया व्यवसनाने अनेकांचे संसार उध्दवस्त झाले आहे.
परतूर शहरासह ग्रामीण भागात चालु असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करावे. नाही तर रिपब्लीकन सेनेच्या परतूर शाखेच्या वतीने दि. 22 ऑगस्ट 2023 रोजी तहसिल कार्यालया समोर रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा जयपाल भालके तालुका अध्यक्ष, परतूर रिपब्लीकन सेना कैलास भालके रामभाऊ रामभाऊ पाईकराव, दाहाव सर्जेराव अंभोरे दादाराव दंवडे विशाल पाईकराव योगेश खरात निर्मला वाघमारे निमीला महिला तालुका अध्यक्ष, परतूर रिपब्लीकन सेना प्रभाकर मुंढे अजय, प्रधान यांनी दिला आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

