उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगलीच्या वतीने वर्षावास आणि श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने दिनांक 1 जुलै 2023 रोजी सायंकाळी सात वाजता विहाराचे माजी सचिव प्राध्यापक अशोक भटकर सर यांची धम्मदेशनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्राध्यापक अशोक भटकर यांनी श्रावण पौर्णिमे दिवशी बुद्ध काळामध्ये भगवान बुद्धाच्या जीवनातील दोन घटना सविस्तरपणे मुद्देशीर विषद केल्या. अंगूलीमालाचे नाव अहिंसक होते अंगुलीमाल यांना संघात प्रवेश आणि पुढे तो अर्हत झाला आणि दुसरी घटना अशी की भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर सुभद्रा नावाचा भिक्षु हा भिक्षू संघामध्ये दिशाभूल करू लागला आणि मन मानेल तसा अप्रचार करू लागला म्हणून त्याला प्रतिबंध करून भगवान बुद्धांच्या वचनांचे संगायन करण्यासाठी भगवान बुद्धाचे आवडते शिष्य महाकाश्यप यांनी 500 अर्हत भिक्खूंची गृधकुट पर्वतावर सप्तपर्णी गुन्फा येथे पहिली धम्म सगिती आयोजित केली त्यात त्रिपिटकाचे सांगायान या सांगिती मध्ये झाले आणि जगात सर्वप्रथम त्रिपीटक धम्मग्रंथ निर्माण झाला. असे मोलाचे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संचालन चंद्रकांत चौधरी यांनी केले तरप्राध्यापक भटकर सर यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. प्रस्ताविक एस आर माने सर यांनी केले
यावेळी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांचे विचार आयुष्यमान मधाळे साहेब यांच्या दोन्ही सुकन्या यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे मांडले त्यांचा सत्कार संचालिका आयुष्यमती दिपाली कांबळे आणि शैलजा साबळे यांनी करून त्यांचे गोड कौतुक केले . यावेळी उपस्थित प्राध्यापक अशोक भटकर यांनी एन वेळी निमंत्रण दिल्यानंतर ते स्विकारून त्यानी धम्मदेशना दिली. सर्व उपस्थिताचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

