अर्पित वाहाणे आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी:- रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा म्हणणे सोपे असले तरी सेवा करणे ही सर्वांसाठी साधारण कार्य नाही हया अतुलनीय कार्याचा मनापासून विचार करायला जमिनीवर येऊन कार्य करावे लागते. तेव्हाच आपण नाव रुग्ण सेवकांच्या यादीत समाविष्ट होते. असेच एक रुग्ण सेवक म्हणजे रामू राठी.
रुग्ण सेवक आणि समाजसेवक म्हणून ज्यांची मागिल अनेक वर्षांपासून आर्वी तालुक्यात ओळख आहे. असे रामू राठी हे आर्वी शहरात निस्वार्थपणे आरोग्य सेवेसाठी दिवस-रात्र धडपड करुन, सामान्य नागरिकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याचे कार्य हे उत्कुष्ट ठरत आहे व येवढं नव्हे तर त्यांनी कोरोणा सारख्या भयानक संकटात आपल्या जिवाची पर्वा न करता एक जनसेवक म्हणुन त्यांनी सामान्य नागरिकांना प्रचंड अशी मदत केली होती.
रामू राठी यांच्या कार्याची दखल घेऊन सर्व प्रथम यांना कोरोणा योद्धा पुरस्काराने सन्मानित करून आर्वी शहराचे प्रथम कोरोणायोद्धा म्हणुन त्यांची संपुर्ण आर्वी तालुक्यात ओळख निर्माण झाली.
मी या पुढेही रुग्णालयासंबंधी कीवा इतर समस्यानकरीता नागरीकांच्या मदतीला सैदव तत्पर आहे असे माजी आरोग्य सभापती राठी, यांनी सांगितले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

