आसमा सय्यद, पुणे शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. शहरातील विश्रामबाग पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या उपनिरीक्षक शंकर धोंडिबा कुंभारे यांना 15 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही जर 50 हजार रुपये दिले. तर एका प्रकरणामध्ये तुमच्यावर गुन्हा दाखल करणार नाही. अशी मागणी उपनिरीक्षक शंकर धोंडिबा कुंभारे यांनी फिर्यादीकडे केली. त्यावर फिर्यादी आणि आरोपी पोलीस यांच्यामध्ये पैसे किती द्यायचे. या संदर्भात चर्चा झाल्यावर 50 हजाराऐवजी 30 हजार देण्याचे ठरले. त्यानुसार आज 30 हजार रुपयांऐवजी 15 हजार देण्याचे ठरले.
या एकूण प्रकरणाबाबत फिर्यादी यांनी लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर आज सापळा रचून उपनिरीक्षक शंकर धोंडिबा कुंभारे यांना 15 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

