संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शहरातील पाचपावली येथील बहुचर्चित गौरव हेमराज दरवाडे यांच्या हत्याकांडाचा महत्वपूर्ण निकाल जाहीर करण्यात आला. नागपुर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. पी. देशमुख यांनी 3 आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यात रजत भगवानदास पाली वय 28 वर्ष, अनिकेत उर्फ अन्नी महेंद्र मेश्राम वय 30 वर्ष आणि राहुल उर्फ काल्या अनूप खरे वय 31 वर्ष अशी शिक्षा ठोकवण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
या हत्याकांडातील 3 आरोपींचा या आगोदर मृत्यू झाला आहे. यामध्ये अखिल उर्फ काल्या मोटघरे याने याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात गळफास लावून आत्महत्या केली होती. गौरव उर्फ पांड्या अशोक पिल्लेवार याची 2019 मध्ये हत्या झाली आणि भगवान भैयालाल पाली याचाही मृत्यू झाला. तर सातवा आरोपी नामदेव कुंभरे वय 36 वर्ष याची या हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.
आरोपींचे परिसरातच राहणाऱ्या गौरव हेमराज दरवाडे वय 24 वर्ष याच्याशी जुने वैमनस्य होते. 5 जानेवारी 2017 च्या दुपारी आरोपींनी कमाल चौकातील गुणगुण जनरल स्टोअरजवळ गौरवला घेरले. कुऱ्हाड आणि चायनीज चाकूने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली होती. मध्यस्थी करण्यासाठी आलेला गौरवचा मित्र लक्की कांबळे याच्यावरही धारधार शस्त्रांनी वार करून गंभीर जखमी केले होते. पोलिसांनी गौरवचा मित्र रोहित वानखेडेच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल करून यशस्वी तपास करून हे प्रकरण न्याप्रविष्ठ केले होते.
सहायक पोलिस निरीक्षक मंगला मोकाशे यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सरकारी वकील रश्मी खापर्डे यांनी न्यायालयासमोर 20 साक्षीदारांची साक्ष नोंदविली. अनेक साक्षीदार आपल्या जबानीवरून पलटले. मात्र गौरवच्या आईची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच सीसीटीव्ही फुटेजही आरोपींना शिक्षा मिळवून देण्यात महत्त्वाचे ठरले. न्यायालयाने तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून पोहवा देवेंद्र कुसरे यांनी अभियोजन पक्षाला सहकार्य केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

