संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- तरुणवर्गाला अमली पदार्थाच्या व्यसनात ओढण्याचे सापळेच नागपुर आणि आसपासच्या गावात निर्माण झाले आहेत. त्यामुळे तरुणांमध्ये अमली पदार्थांच्या व्यसनाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या व्यसनामुळे अनेक तरुणाचे आयुष्य बर्बाद होत आहे.
नागपुर शहरातील लक्ष्मीभुवन चौकातील एका कॅफेमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या एका हुक्का पार्लरचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. या कॅफेवर धाड टाकल्यावर पोलिसांना ग्राहक हुक्का पिताना आढळून आले. ही घटना सिताबर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत समोर आली आहे. यावर गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाने ही कारवाई केली.
शहरात कॅफेच्या आडून मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर्स सुरू असून त्यावर कठोर कारवाईच्या सूचना पोलीस आयुक्तांनी काही दिवसांअगोदर दिल्या होत्या. गोतमारे कॉम्प्लेक्स येथील दुसऱ्या माळ्यावरील क्युबा स्पोर्ट्स कॅफे ॲंड लॉंज येथे हुक्का पार्लर सुरू असल्याची गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली. बुधवारी मध्यरात्री १.२० वाजता पोलिसांनी तेथे धाड टाकली. त्यावेळी तेथे हुक्का विक्री सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तेथून हुक्का पॉट, फ्लेवर्ड तंबाखू जप्त केले. पोलिसांनी अफराज आसिफ धनडाला वय २३ वर्ष रा. कावरपेठ, रामसुमेर बाबा नगर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

