अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो.नं. -9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर 3 ऑगस्ट:- स्त्री शिक्षणाचे जनक, थोर समाज सुधारक, सर्व बहुजनांना गुलामगिरीतून सोडविणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व महापुरुषाबंदल कायम अवमानकारक, अपशब्द बोलून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे यांच्या विकृत मनोवृत्तीचा माळी समाज सावनेरच्या वतीने निषेध करून तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन या विकृताविरूध गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी समाजसेवी सुनील चाफेकर यांच्या नेतृत्वाखाली माळी समाजाच्या शिष्टमंडळात पुर्व नगरसेवक तेजसींग सावजी, निलेश पटे, लक्ष्मीकांत दिवटे, दिपक बसवार, किशोर चांदुरकर, प्रकाश धांडोळे, अशोक धांडोळे, चंद्रशेखर बनाईत, प्रशांत घोळसे, शेषराव वाडीकर, किशोर घोळसे, दिवाकर नारेकर , गिरीश बनाईत,पिंटू सातपुते, मंगेश चरपे, शुभम बनकर, शुभम चाफेकर, शंकर वाडबुधे, रितेश बनकर, सुहास चरपे, अभिषेक सातपुते, अनिल चरपे, मधुकर चरपे, प्रविण लांडे, ज्ञानेश्वर सातपुते, शशीकांत धान्डोळे, हरिदास सातपुते, यशवंत भुडके, मनोहर महतपूरे, मनोज नारेकर, किरण धांडोळे, नितेश चरपे इत्यादी समाजबांधव उपस्थित होते.

