✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा,दि.3:- सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आपल्या शेतात किटकनाशकाची फवारणी करतात पण काही वेळ ही किटकनाशक जीवघेणे ठरत असते अशा काही घटना मागील वर्षी समोर आल्या होत्या. किटकनाशक फवारणी करताना काळजी कशी घ्यावी याबाबत शेतकऱ्यामध्ये जनजागृती करण्याकरीता चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या चित्ररथाचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी हिरवी झेंडी दाखवून केला.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर, कृषि विकास अधिकारी संजय बमनोटे तसेच कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. शेतक-यामध्ये किटकनाशकापासून फवारणी करतांना शेतक-यांना विषबाधा होऊ नये यासाठी प्रत्येक गावांमध्ये जनजागृती करण्यात यावी. तसेच ग्रामपंचायतीमध्ये सुध्दा माहिती पत्रक लावण्यात यावे, त्याचबरोबर शेतक-यांनी सुध्दा किटक नाशकाची फवारणी करतांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन चित्ररथाच्या शुभारंभ प्रसंगी रोहन घुगे यांनी केले. आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

