Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वारजे माळवाडी पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी ! टोळी प्रमुख ओंकार उर्फ टेडया उमेश सातपुते व त्याचे इतर ०४ साथीदार यांचेविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई

पंकेश जाधव by पंकेश जाधव
August 4, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
वारजे माळवाडी पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी ! टोळी प्रमुख ओंकार उर्फ टेडया उमेश सातपुते व त्याचे इतर ०४ साथीदार यांचेविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. १७/०६/२०२३ रोजी फिर्यादी हे जयभवानी चौक, रामनगर येथील त्यांचे घराचे समोर रोडवर मित्रासह क्रिकेट खेळत असताना त्यांच्या ओळखीचे किरण गावडे, अविष्कार पवार व सोहम सातव यांनी फिर्यादीस जवळ बोलावून शिवीगाळ करून, आज तुला आम्ही खल्लासच करतो असे म्हणून त्याचेकडील बंदुक फिर्यादीचे दिशेला रोखल्याने फिर्यादीने सदरची बंदुक हाताने वळविल्याने त्यातील गोळया जमिनीवर फायर झाल्या. त्याचवेळेस अविष्कार पवार याने त्याच्याकडील बंदुकीने फिर्यादीवर फायर केल्याने तेथील लोक सैरावैरा पळू लागले. फिर्यादीवर फायर केलेली त्यातील गोळी फिर्यादीच्या कमरेच्या पाठीमागे डाव्या बाजूस लागून फिर्यादीला जखमी करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांचेविरुध्द बारजे माळवाडी पो.स्टे २४३ / २०२३ भा.द.वि. कलम ३०७,३४, आर्म अॅक्ट कलम ३ (२५) महा. पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५, क्रि. लॉ. अ. का. कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
दाखल गुन्हयाचा तपास पोलीस उप-निरीक्षक, काळे हे करीत असताना, विधीसंघर्षग्रस्त बालकांकडे त्यांच्या नातेवाईकांसमोर विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा पूर्ववैमनस्यातून १ ओंकार उर्फ टेडया उमेश सातपुते २. पीर फकीरा युवराज कांबळे यांच्या सांगण्यावरून पुर्वनियोजिटकट रचून केला असल्याचे सांगितले. तपासामध्ये सदर आरोपीनी विधीसंघर्षीत बालकांचा गुन्हयामध्ये चापर करून गुन्हा करण्याकरीता संगनमताने कट रचून गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने दाखल गुन्हयामध्ये भा.दं.वि.क १२०(ब) व बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ चे कलम ८३(२) प्रमाणे कलमवाढ करण्यात आलेली आहे.
त्यामुळे १. ओंकार उर्फ टेडया उमेश सातपुते, वय-२३ वर्षे, रा. सनं १३५, यशोदिप सोसायटी, संघर्ष चौक, वारजे माळवाडी, पुणे ( अटक) २. बीर फकीरा युवराज कांबळे, वय-२२ वर्षे रा. जिजाई अपार्टमेंट, सरडे बाग, शिवणे, पुणे व इतर ०३ विधीसंघर्षित बालक यांनी केला असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले असून, त्यामधील ओंकार उर्फ टेडया उमेश सातपुते यास अटक करण्यात आलेली असून, इतर विधि संघर्षित बालकांना ताब्यात घेवुन, पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वीर फकीरा युवराज कांबळे हा (पाहिजे आरोपी) आहे.

वर नमूद अटक आरोपी यांचेकडे सखोल तपास केला असता आरोपी नामे ओंकार उर्फ टेडया उमेश सातपुते ( टोळी प्रमुख) हा प्रत्येक गुन्हयामध्ये काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवून गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने दाखल गुन्हयात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करणेबाबतचा प्रस्ताव श्री. सुनिल जैतापुरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे यांनी मा. पोलीस उप आयुक्त, परि ३ पुणे शहर, श्री. सुहेल शर्मा यांचे मार्फतीने मा. अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री. प्रविण पाटील यांना सादर केलेला होता सदर प्रस्तावाची छाननी केल्यानंतर आरोपी नामे ओंकार उर्फ टेडया उमेश सातपुते ( टोळी प्रमुख) याने आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयामध्ये काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवून गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.आरोपी नामे ओंकार उर्फ टेडया उमेश सातपुते ( टोळी प्रमुख) याने आपले अधिपत्याखाली प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवून स्वतःची संघटीत टोळी तयार करून अपराध केलेले असून यातील आरोपी यांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, दरोडा, गुन्हा करण्यासाठी कट रचणे, बेकायदेशिर अग्नीशस्त्र जवळ बाळगणे, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे जीवे ठार मारण्याची धमकी देणे, दुखापत करणे, पोलीसांच्या आदेशाचा भंग करणे यासारखे गंभीर गुन्हे वारंवार केले असल्याने दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३(१)( 11 ) ३(४) या कलमाचा समावेश करणे बाबत मा अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे, श्री. प्रविणकुमार पाटील यांनी मंजुरी दिलेली आहे.

सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, पुणे शहर, श्री भिमराव टेळे करीत आहेत.

सदरची कामगीरी मा.पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त पुणे शहर ,श्री. संदिप कर्णीक, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परि-३, पुणे शहर श्री सुहेल शर्मा, मा. सहा. पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग पुणे शहर, श्री.भिमराव टेळे यांचे मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल जैतापुरकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री अजय कुलकर्णी, निगराणी पथकाचे पोलीस उप-निरीक्षक, विशाल मिडे, पोलीस अमंलदार, संभाजी दराडे, विजय खिलारी, नितीन कातुर्डे यांनी केली आहे.

मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्राणांवर बारकाईने लक्ष देवुन शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व नागरीकां मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अमलदार यांना निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही ४२ वी कारवाई आहे.

Previous Post

खुनाच्या गुन्हयातील सुमारे ०९ वर्षापासुन कोर्ट फरारी असलेल्या आरोपीस दरोडा विरोधी पथकाने पकडले…….

Next Post

कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकांची धडाकेबाज कामगिरी ! मजुरीचे १००/- रू देण्यास विरोध केलेल्या मामाचा खून करणाऱ्या भाच्याला ठोकल्या बेड्या….

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकांची धडाकेबाज कामगिरी ! मजुरीचे १००/- रू देण्यास विरोध केलेल्या मामाचा खून करणाऱ्या भाच्याला ठोकल्या बेड्या….

कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकांची धडाकेबाज कामगिरी ! मजुरीचे १००/- रू देण्यास विरोध केलेल्या मामाचा खून करणाऱ्या भाच्याला ठोकल्या बेड्या....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In