अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांन सह संपुर्ण अकोला शहरातील नागरिक डोळ्यांच्या साथीमुळे बेजार झाले आहेत म्हणून संपुर्ण अकोला जिल्ह्यात डोळे तपासणी मोहीम राबवा अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांनी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या डोळ्यांच्या व्हायरल कंजक्टीव्हायटीसची साथ सुरू असुन दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत समस्त नागरिक डोळ्यांच्या दुखण्यामुळे त्रस्त झाले आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या आधीच सर्दी खोकला यामुळे बरेचसे नागरिक ग्रासले असताना ते बरे होतात की नाही तर त्यामध्ये डोळ्यांच्या साथीमुळे आणखीन भर पडली आहे अकोला जिल्ह्यातील बऱ्याच गावातील व शहरातील लोकांना याची लागण झाली आहे. डोळे लाल होणे, चिकट होणे डोळ्यात सारखे खूपच राहणे ही या आजाराची मुख्य लक्षणे आहेत डोळे येण्याची साथ एखाद्या कुटुंबातील एका सदस्याला लागण झाल्यास संपूर्ण कुटुंबाला ग्रासून टाकत आहे त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे म्हणून संपुर्ण अकोला जिल्ह्यातील प्रत्येक गावात वस्त्या मध्ये तसेच शहरातील प्रत्येक वार्डात, प्राथमिक शाळा, विद्यालय, महाविद्यालय आदी ठिकाणी डोळे तपासणी मोहीम राबवा व डोळ्यांच्या औषधीचा तुटवडा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी उमेश सुरेशराव इंगळे महासचिव महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. याची प्रतिलिपी कविता द्विवेदी मॅडम आयुक्त महानगरपालिका अकोला, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश असोले, महानगरपालिका आरोग्य अधिकारी,तसेच डॉ तरंगतूषार वारे मॅडम जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन दिले आहे.

