पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626
गुन्हे शाखा, यूनिट-३ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज!ऑनलाईन पुणे :- दि. ०४/०८/२०२३ रोजी गुन्हे शाखा युनिट ३. पुणे कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे दत्तवाडी पोलीस ठाणे हददीत गुन्हे प्रतिबंध पेट्रोलिंग करत असताना पु. ल. देशपांडे उदयानाजवळ एक इसम चारचाकी टेम्पोमध्ये संशयीत हालचाल करीत असताना सहायक पोलीस फौजदार संतोष क्षिरसागर यांना दिसून आल्याने त्याचेवर पाळत ठेवून त्यास ताब्यात घेतले असता त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अभिषेक शरद पवार वय ३५ वर्षे, रा. ७४२ गुरुवार पेठ, पुणे असे सांगीतले. त्याबाबतचा अधिक तपास करता नमुद आरोपी हा पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार असल्याचे समजून आले. त्याचेकडे मिळून आलेल्या टेम्पोबाबत अधिक तपास करीत असताना सदरचा टेम्पो हा त्याने काही दिवसांपुर्वी स्वारगेट परीसरातुन चोरी करून आणल्याचे कबुल केले.
नमुद आरोपीकडे कैले तपासात त्याने दारूच्या व्यसनासाठी स्वारगेट, हडपसर, कात्रज या परीसरातुन चोरून सदर वाहनांचा उपयोग भाडे घेणेकरीता करून त्यातुन मिळणा-या पैशातून तो त्याचे दारूचे व्यसन करत असल्याचे सांगीतले. त्यांचेकडून १) १,५०,००० /- रू किंचा एक टाटा कंपनीचा अस टेम्पो २) २,५०,०००/- रुपये किं. चा एक मारुती सुझुकी कंपनीचा टेम्पो, ३) १.५०,०००/- रुपये किं ची एक मारूती सुझुकी कंपनीची स्वीफ्ट कार तिचा अशी तीन वाहने कि रु ५,५०,०००/- ची मिळून आल्याने ती जप्त करण्यात आलेली आहेत. नमुद आरोपीकडून १) स्वारगेट पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर २०६ / २०२३ भादंविक ३७९, २) हडपसर पोलीस ठाणे पुणे गुन्हा रजि. नंबर १०६० / २०२३ भादंविक ३७९ ३) भारती विदयापीठ पोलीस ठाणे पुणे गुन्हा रजि. नंबर ४७३ / २०२३ भादंविक ३७९ असे तीन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
सदरची कामगिरी ही, मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह-आयुक्त, पुणे शहर श्री संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. अमोल झेंडे, यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर, श्री. सुनिल तांबे गुन्हे शाखा युनिट-३ चे प्रभारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस उप-निरीक्षक अजितकुमार पाटील, पोलीस उप- निरीक्षक राहुल पवार, पोलीस अंमलदार संतोष क्षिरसागर, शरद वाकसे, सुजीत पवार, संजिव कळंबे, गणेश शिंदे, साईनाथक कारके ,भाग्यश्री वाघमारे यांचे पथकाने केली आहे.

