तिरुपती नाल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधि
मो. 9822477446
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- आज दिनांक ०७ ऑगस्ट ला ग्रामपंचायत खामोना अंतर्गत खामोना येथे श्री. हरिदास चंद्रभान झाडे, सरपंच ग्रामपंचायत खामोना यांच्या हस्ते जनसुविधा अंतर्गत ग्रामपंचायत जुनी इमारत ते नवीन ग्रामपंचायत इमारत सिमेंट कॉन्क्रेट रोड बांधकाम ( रुपये १० लक्ष ) चे उद्घाटन करण्यात आले.
त्यावेळी सरपंच हरिदास चंद्रभान झाडे ग्रामपंचायत खामोना , उपसरपंच शारदा जगदीश तलांडे, उपसरपंच ग्रामपंचायत खामोना, मारोती शामराव चन्ने, सदस्य ग्रामपंचायत खामोना कवडू बळीराम सातपुते, सदस्य ग्रामपंचायत खामोना, सोनी नवनाथ ठक, सदस्या ग्रामपंचायत खामोना, अल्का दिलीप वैद्य, सदस्या ग्रामपंचायत खामोना सौ. लक्ष्मि गरीब लोणारे, सदस्या ग्रामपंचायत खामोना, विनोद केवे ग्रामसेवक खामोना तसेच दिलीप रामदास गिरसावळे , प्रभाकर गिरसावळे, नवनाथ ठक, संदेश पावडे ( कंत्राटदार ), साईनाथ लोणारे शिपाई ,नवनाथ मिलमिले सफाई कामगार , संजय बुटले केंद्रचालक ई. व गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते …

