देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : वंचितचे साहेबराव चंदनशिवे यांचे पोलीस प्रशासनास निवेदन.
उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आटपाडी:- करगणी ता. आटपाडी येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखा करगणी यांच्यावतीने 13 ऑगस्ट रोजी संभाजी भिडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास परवानगी देऊ नये, दिल्यास आटपाडी तालुक्यातील संपूर्ण बहुजन समाज आंदोलन छेडण्यासाठी रस्त्यावर येईल आणि होणाऱ्या परिणामास पोलीस प्रशासन जबाबदार राहील असे आक्रमक निवेदन वंचित बहुजन आघाडीचे आटपाडी तालुका अध्यक्ष साहेबराव चंदनशिवे यांनी दिले आहे.
आपल्या व्याख्यानातून तरुणांना खोटा इतिहास सांगून तरुणांची माथी भडकविण्याचे काम संभाजी भिडे करीत आहेत. अशाच प्रकारची गरळ ओकण्याची व शांतताप्रिय समाजात ठिणग्या पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या करगणी येथील व संपूर्ण तालुक्यात कुठेही व्याख्यानास परवानगी देण्यात येऊ नये असे वंचित बहुजन आघाडीने निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर आबासो काटे, संतोष वाघमारे, रविकांत सोहनी, साहेबराव वाघमारे, जगन्नाथ सावंत, दशरथ सोहनी, नंदकुमार पवार, संजय हेगडे, यशवंत आईवळे, शुभम सागर, गोविंद हेगडे, राहुल साबळे, नानासो गवंड, रघुनाथ चव्हाण, मनोहर जावीर यांच्या सह्या आहेत.
श्री. शिवछत्रपतींचे हिंदवी स्वराज आणि बत्तीस मण सिहासन या विषयावरती त्यांचे करगणी येथे 13 ऑगस्ट रोजी व्याख्यानाचे आयोजन केले आहे. अमरावती जिल्ह्यात महात्मा गांधी यांच्या विषयी व त्यांच्या वडीलाविषयी गैरसमज, अपमानास्पद करणारी माहिती दिल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. त्यातच करगणी येथेही असेच होण्याची शक्यता असलेने त्याच्या भाषणावरती बंदी घालनेची गरज आहे.
‘कुंकू लावून ये, मग तुझ्याशी बोलीन’ असे महिला पत्रकाराविषयी गैरवर्तन, आंबा खाल्ल्याने मुले होतात, भीमा कोरेगाव प्रकरणातील संशयित संभाजी भिडे ही मनुवादी विचारसरणी जोपासणारी महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. भिडेंच्या वक्तव्याप्रकरणी नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनातही गदारोळ झालेला आहे. आजपर्यंत भिडेंना अटक झाली नाही म्हणजे भिडे हे महात्मा गांधीपेक्षा श्रेष्ठ आहेत नि की काय ? असा सवाल ही वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांच्या व्याख्यानास बंदी घालावी अशी मागणी होत आहे.
संभाजी भिडे व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा: अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रपिता महात्मा गांधी विषयी बेताल वक्तव्याप्रकरनी त्यांचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा अशा मागणीचे दुसरे निवेदन वंचित बहुजन आघाडीने दिले आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनीही याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा याकरिता नुकतेच निवेदन दिले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

