मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील रेल्वे स्थानकावर अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत 23.72 कोटीचा रक्कमेच्या पुनविकासचा पायाभरणी सभारंभ आमदार समीर कुणावार, माजी खासदार सुरेश वाघमारे, रेल्वे विभागचे नोडल अधिकारी सुभेष वर्मा, मनमोहन साहू, अभय पुनवटकर, विरभान मीना, तितीरमारे, स्टेशन प्रबंधन एच.जी. पाटील तथा सर्व वाणिज्य विभागचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
आमचे हिंगणघाट आता सुंदर स्टेशन होईल ह्याचा आम्हाला अभिमान व आनंद आहे. एक विनंती बल्लारशाह-पुणे, बल्लारशाह-मुंबई येथे रोज गाडी देण्यात यावी, नागपुर करीता मेमो, बल्लारशाह-भुसावल पैसेंजर सुरू करावी, हिंगनघाट रेल्वे स्थानकांचा पुर्णपणे कायापलट होणार आहे. या करीता हिंगणघाट रेल्वे स्थानकांचा गाड्यांचे अधिक थांबे मिळावे याकरीता सुद्धा आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याकरीता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार यांचे वर्धा-बल्लारशाह यात्री संघाने आभार मानले आहे. यावेळी बाबुसिंग गहेरवार, लिलाधर मडावी, राजेश अ. कोचर, विजय मुथ्था, डि.के. गुरूनुले, दिलीप बालपांडे, किरण वैद्य, मुन्ना त्रिवेदी, चंद्रशेखर खापरे, सुनिल डोंगरे, तपेश चंदाराणा, रवि जुमडे आदि उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/73854445348

