पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत शिक्षा देण्याची मागणी. व्हाईस ऑफ मीडिया द्वारे नागपूर जिल्हयातील पत्रकारांनी नोंदविला निषेध.
अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नं -9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर काही समाज कंटकांनी हल्ला करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याने संपुर्ण महाराष्ट्र राज्यात संतापाची लाट उसळली. त्यामुळे पत्रकार संघटनांनी निषेध व्यक्त करण्यात सुरुवात केली आहे.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असून तो लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी लोकजागृतीचे व समाज प्रबोधनाचे कार्य करित असतो. अशा देशसेवेचे व्रत अंगीकारणाऱ्या जागृत पत्रकारावर भ्याड हल्ला होणे हे भारतीय लोकशाहीला काळीमा फासणारे कृत्य आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यास पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणीचे निवेदन व्हाॅईस ऑफ मीडीया चे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, अनिल म्हस्के (प्रदेशाध्यक्ष), विनोद बोरे (साप्ताहिक विंग प्रदेशाध्यक्ष ), आनंद आंबेकर (नागपूर जिल्हाध्यक्ष) गोपाल कडूकर (राज्य सहसरचिटणीस) यांच्या मार्गदर्शनात पांडुरंग भोंगाडे (नागपूर जिल्हाध्यक्ष साप्ताहिक विंग) यांच्या नेतृत्वात नायब तहसिलदार विजय कोहळे यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी व्हाॅईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंगचे उपाध्यक्ष दिनेश इंगोले,सहसरचिटणीस रमेश वानखेडे, संघटक अनिल अडकिने, विक्रम गमे, प्रवक्ता संकेत जगनाडेसह अनेक पत्रकार व संपादक उपस्थित होते.

