✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्ह्यात सेलू तालुक्यात मौजा कोतीवाडा येथे राहणारा चेतन गोंडाणे हा गायमुख येथून कोलगाव मार्गे सेलू येथे त्याचे बिना नंबरच्या पांढऱ्या रंगाच्या मोपेड गाडीने गावठी मोहा दारू अवैध रित्या वाहतूक करणार आहे अशी मुखबीरकडून खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पंच व पोलीस स्टापसह मुखबीर यांचे माहीतीप्रमाणे रवाना होऊन कोलगाव ते सेलू रोडवरील पोहणे यांचे बैलबंड्या समोर सापळा रचून थांबले असता काही वेळाने एक इसम हा पांढऱ्या रंगाच्या बिना नंबरच्या मोपेड गाडीने येताना दिसल्याने त्यास पोलीस स्टॉपचे मदतीने थांबवून त्याचे ताब्यातील होंडा कंपनीच्या मोपेड ची पाहणी केली असता त्याचे ताब्यातून 4 प्लास्टिक डबकित 112 लिटर गावठी मोहा दारू किंमत 23,200 रू. व बिना नंबरची होंडा कंपनीची मोपेड गाडी अंदाजे कि. 90,000 रू. असा एकूण जू. की. 1,13,200 रू चा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपी चेतन अवधूत गोंडाणे, वय 28 वर्ष, रा कोथिवाडा, ता. सेलू, जि.वर्धा हा अवैधरीत्या गावठी मोहा दारू ची वाहतूक करतांना मिळून आल्याने पो.स्टे. सेलू येथे कलम 65 अ, ई, मदाका सहकलम 3(१), 181,130,177 मोवाका अन्वये कार्यवाही करण्यात आली.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडीत यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सपोनि. तिरुपती राणे पो.स्टे सेलू यांचे निर्देशाप्रमाणे डी. बी. पथकाचे पोलिस अंमलदार गणेश राऊत, ज्ञानदेव वनवे, यांनी केली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

