युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय, नवी दिल्ली व विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने “अन्नाभाऊ साठे यांच्या जयंती प्रित्यर्थ” गुरुपुजा सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार समारोह, स्वर्गीय श्री धर्मदासजी भिवगडे यांचा व्दितीय पुन्यतिथी निमित्ताने गुरुवार दिनांक १० ऑगस्ट रोजी कन्हान येथील “कुलदीप मंगल कार्यालयात” लोककला सोहळा साजरा करण्यात आला.
ह्या सोहळ्याचे आयोजक विदर्भ शाहीर कलाकार परिषद केंद्रीय कार्यालय कन्हानचे अध्यक्ष श्री मनिष धर्मदासजी भिवगडे, कार्याध्यक्ष श्री अलंकार गुलाबराव टेंभुर्णे सर्व विदर्भ शाहीर कलाकार परिषद व पदाधिकारी होते.
हा कार्यक्रम सकाळी ९ ते रात्री ६ पर्यंत सुरू होता कार्यक्रमास असंख्य कला मंडळाने आपला सहभाग नोंदविला व आपापल्या कला प्रदर्शित केल्या यात शाहिरी पोवाडा,भारूड,भजन, कीर्तन,डहाका,दंडार,आदी असंख्य कला कलाकारांनी सादर करत रसिकांच्या मनात घर करून आनंदीत केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री राजेन्द्रजी मुळक, माजी मंत्री व जिल्हा अध्यक्ष नागपूर ग्रामीण तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. रश्मीताई बबलु बर्वे या उपस्थित होत्या यावेळी मंचावर श्री दयाल कांबळे (नागपूर जिल्हा अध्यक्ष, विदर्भ शाहीर कलाकार परिषद), श्री अरूणजी वाहाणे (कळमेश्वर तालुका अध्यक्ष, विदर्भ शाहीर कलाकार परिषद), पुरूषोत्तम डांगोरे (तालुका अध्यक्ष नरखेड), ज्ञानेश्वर तायवाडे, शाहीर यादोराव खानोलकर सावनेर(जिल्हाध्यक्ष), मंचावर उपस्थित होते.
या कार्यक्रमास मार्गदर्शन करताना राजेंद्र मुळक यांनी कलाकारांच्या समस्या जाणून घेत कलाकारांच्या मानधनात वाढ व्हावी ह्यासाठी शासन स्तरावरून आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

