हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर, दि. 11 ऑगस्ट:- वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर शहराच्या वतीने कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी एल्गार पुकारन्यात आला. आज शासनाने खाजगीकरण धोरण स्वीकारून खाजगी कंपनीच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने कामगारांना कामावर घेण्यात येत आहे. त्यामुळे अशा कंपन्या या कामगारांवर अन्याय करत आहे अशा तक्रारी समोर येत आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने याची दखल घेऊन तहसील कार्यालय मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले.
बल्लारपूर शहरात घडलेल्या दुर्दैवी घटनेचा संदर्भ घेऊन वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर ने राज्याचे मुख्यमंत्री तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तहसीलदार मार्फत निवेदन प्रेषित केले. या निवेदनात मागणी करण्यात आली की बल्लारपूर शहरातील अधिकांश खाजगी व शासकीय कंत्राटी कामगारांवर अन्याय होत असून त्याची चौकशी करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर व्दारे करण्यात आली. यावेळी जिल्हा अध्यक्ष सोमाजी गोंडाणे, तालुका निरीक्षक मधूकर उराडे, जिल्हा उपाध्यक्ष रमेश लिंगमपल्लीवार, बल्लारपूर शहर महासचिव उमेश ज.कडू, महिला आघाडीच्या जेष्ठ सल्लागार सत्यभामा भाले, नम्रताताई साव, प्रभुदास देवगडे, सतिश नगराळे, पराग जांभुळकर, भीमराव पाझारे, प्रकाश तावाडे, प्रियंका शिंगाडे, शुभम नागापुरे, सुगीत रामटेके व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

