Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

मुख्यमंत्र्याच्या गृहशहर ठाणे मधील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 13, 2023
in आरोग्य, ठाणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
मुख्यमंत्र्याच्या गृहशहर ठाणे मधील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के मुंबई शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गृहशहरातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. ठाणे महानगर पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटनेने एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे ठाणे महानगर पालिकेच्या रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गृह जिल्हा असून त्याच्या गृह शहरात असलेल्या महानगर पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरी डॉकटर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे एकच रात्री 17 जणांनी आयुष्य गमावले. यातील 13 रुग्ण हे आय.सी.यू मधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्ड मधील होते, रुग्णालय प्रशासनाने या बातमीला दुजोरा दिला असून, काही रुग्ण खाजगी रुग्णालयातून अगदी शेवटच्या क्षणी आल्याने, काही रुग्ण 80 पेक्षा जास्त वयाचे असल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.

येथील सिव्हील रुग्णालय बंद झाल्यापासून ठाणे जिल्ह्यातील सर्व रुग्ण इथेच येत असल्याने आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे, 10 तारखेला एकच दिवशी 5 जणांचा मृत्यू झाला होता त्यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर पक्षांनी रुग्णालयात जाऊन आंदोलन केले होते, आता केवळ रात्री 10.30 पासून सकाळी 8.30 पर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे

मुख्यमंत्री यांचे ठाणे जिल्हा, मुख्यमंत्री यांची ठाणे महानगरपालिका, त्यात असलेली वर्षानुवर्षांचया सत्ता आणि त्याच महानगरपालिकेचे हे छत्रपती शिवाजी हॉस्पिटल असल्याने आरोग्य व्यवस्था पुर्णत मोडकळीस आलेल्या दिसून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुपर स्पेशलिटी कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन ठाण्यात केले होते, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी देखील मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे, मात्र हे करत असताना सर्वात जुने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय दुर्लक्षित झाले आहे का असा प्रश्न निर्माण होतोय.

Previous Post

गोंदिया: आईने आपल्या मुलाच्या उपचारासाठी उसने घेतले पैसे, मग अस काही झाल की संपूर्ण गोंदिया जिल्हा हादरला.

Next Post

तुमसर येथील महिला महाविद्यालयांमध्ये “महिला अत्याचार व लैंगिक शोषण” या विषयावर समुपदेशन कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
तुमसर येथील महिला महाविद्यालयांमध्ये “महिला अत्याचार व लैंगिक शोषण” या विषयावर समुपदेशन कार्यक्रम संपन्न.

तुमसर येथील महिला महाविद्यालयांमध्ये "महिला अत्याचार व लैंगिक शोषण" या विषयावर समुपदेशन कार्यक्रम संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In