अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी:- ओमनीष्ट ह्यूमन अँड मल्टिपरपज असोसिएशन व आदर्श एकता सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने 76 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बेरोजगार व गरजू महिलांसाठी रोजगार मेळावाचे आयोजन विश्राम गृह आर्वी येथे करण्यात आले होते.
यावेळी आदर्श सामाजिक संघटनेचे अध्यक्ष गौतम अशोकराव कुंभारे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत महिलांना रोजगार मिळवण्यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर रिजवाना खान अध्यक्ष ओमानिष्ट ह्यूमन अँड मल्टीपरपज असोसिएशन आर्वी व कार्यकर्ता उपस्थित होते. आर्वी तालुक्यातील अनेक बेरोजगार व गरजू महिला यांनी उपस्थित राहून या रोजगार मेळाव्याचा लाभ घेतला.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

