नासिर सुलेमान खान, नवीमुंबई प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नवीमुंबई:- येथील पनवेल परिसरात मोटार बाईक चोरीच्या घटना वाढत आहे. त्यामुळे पोलिसांनी धडक कारवाई करत मोटार बाईक चोरी करणाऱ्या टोळीच्या स्पर्दाफास करत बालगुन्हेगारांसह दोघांना आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. यावेळी गुन्हे शाखेच्या पथकाने या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 5 गुन्ह्यांचा उकल केली आहे त्यात 7 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
नवी मुंबई पोलीस आयुक्ताच्या हद्दीत येणाऱ्या परिसरात वाहन चोरीच्या घटनेत मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. रोड, वाहनतळ व इमारतीच्या परिसरात उभी केलेली वाहने चोरटे पळवून नेत आहेत. या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त मिलींद भारांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकानेही शोध मोहिम सुरू केली आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे, सहायक आयुक्त गजानन राठोड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक माणिक नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रताप देसाई व पथकाने तळोजा व नेरूळ परिसरातून 17 वर्षाच्या दोन मुलांना ताब्यात घेतले. यापैकी एकजण खारघरमध्ये व दुसरा नेरळमधील रहिवासी आहे. त्यांच्याकडून तळोजा, खारघर, सीबीडी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामधील 5 गुन्हे उघडकीस आले आहेत. 4 लाख 55 हजार रुपये किमतीच्या एकूण 7 दुकची हस्तगत करण्यात आल्या आहेत.
तळोजा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यामध्ये अजून कोणाचा समावेश होता का, अजून काही गुन्हे संबंधीतांनी केले आहेत का याचाही तपास केला जात असून या प्रकरणी पुढील तपास अविनाश काळदाते करत आहेत.

