उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली, दि. १९ ऑगस्ट:- मिरज तालुक्यातून मिरजला येण्यासाठी गाड्याच्या फेऱ्या कमी केल्यामुळे व टाइम टेबल नुसार वेळेवर गाडयांच्या फेऱ्या होत नसल्याने विद्यार्थी व नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. मिरज तालुक्यातील ग्रामीण भागात जाण्यासाठी २-३ तास एसटी -बसची वाट पाहावी लागत आहे त्यामुळे वयोवृद्ध, महिला, रुग्ण, विद्यार्थी – विद्यार्थिनी यांना खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागातील नागरिकाचा शहराशी संपर्क तुटत चालला आहे.
मिरज मध्ये इतर जिल्ह्यातून तसेच राज्यातून अस बरेच ठिकाणाहून लोक उपचार घेण्यासाठी रुग्णालयात रुग्ण येत असतात. एसटी बसेस वेळेवर नसल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. रुग्णाची तर होरपळ होत चालली आहे. एसटी स्टँड परिसरात मध्ये अस्वच्छता आहे पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी देखील अस्वच्छता आहे. साफ सफाई देखील स्टँडवर नसते मुतारी मध्ये अस्वच्छता दुर्गधी एसटी स्टँड आजूबाजूला परिसर देखील कायम घाणीने तुंबलेला असतो. तरी एसटीची व्यवस्था लवकरात लवकर सुरळीत करून टाइम टेबल नुसार फेऱ्या करून टाइम टेबल फलक प्रत्येक प्लटफॉर्म वर स्पष्ट अक्षरा मध्ये लिहून तो दर्शनी बाजूस लावण्यात यावा आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा.
येत्या15 दिवसात यांच्यावर कायम स्वरूपी उपाययोजना न झाल्यास वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरेल याची नोंद घ्यावी. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, मिरज तालुकाध्यक्ष विशाल धेंडे, अनिल कांबळे, बाळासाहेब कांबळे, स्वप्नील खांडेकर, निशांत भंडारे, किरण कांबळे आदी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

