पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626
अंमली पदार्थ विरोधी पथक २ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :-दिनांक22/08/23 रोजी अमली पदार्थ विरोधी पथक 2 कडील पो नि सुनिल थोपटे, व स्टाफ बंडगार्डन पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात अमली पदार्थ गैरव्यवहाराच्या अनुषंगाने माहिती काढण्याकरिता पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक सय्यद साहिल शेख व पो कॉ अझीम शेख यांना बातमी मिळाली की,सोहेल युनूस खोपटकर रा मुबंई हा इसम काहीतरी अमली पदार्थ विक्री करिता पुणे रेल्वे स्टेशन येथे येणार आहेत. मिळाले बातमी नुसार त्याबाबत सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडून सदर बाबत छापा कारवाई करून संशयावरून पोलीस अंमलदार यांचे मदतीने सदर इसमांला ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्याचे जवळ 51ग्रॅम,430 मिली ग्रॅम हा अंमली पदार्थ किंमत रुपये 10,30,600.00की. असा एकूण 10,30,600.00/- ऐवज मिळून आला आल्याने तो जप्त करून त्याचे विरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाणे येथे N.D.P.S.Act ८(क) 22 (क) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही माननीय अप्पर पोलीस आयुक्त सो गुन्हे श्री रामनाथ पोकळे ,मा पो उप आयुक्त सो गुन्हे श्री अमोल झेंडे, मा सहा पो आयुक्त गुन्हे श्री सतीश गोवेकर , यांचे मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक 2 चे अधिकारी पो नि सुनील थोपटे, म पो उप निरी. नरके, पो.ना. सय्यदसाहिल शेख,पो. शि. अझीम शेख,स.पो.फॉ . घुले, पो. हवा देशपांडे, जाधव, गायकवाड,पो. ना. शेळके, साळूंखे यांनी केली आहे…

