पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626
डेक्कन पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :-दिनांक २१/०८/२०२३ रोजी श्री. महेश भोसले, पोलीस उप-निरीक्षक, नेम, तपास पथक, डेक्कन पोलीस स्टेशन पुणे यांना दि. २०/०८/२०२३ रोजी नाइट राउंड दरम्यान गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, एचडीएफसी बँक, लॉ कॉलेज रोड डेक्कन पुणे येथील बिल्डींगचे बाजुला अंधारात मोकळया जागी ५ ते ६ इसम लोखंडी कोयत्यासारखे घातक शस्त्रे व एक चारचाकी टेम्पो घेवुन एकत्र जमलेले असुन दरोडा टाकण्याचे तयारीने चर्चाकरीत असल्याबाबतची खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोलीस उप निरीक्षक महेश भोसले यांनी श्री. विपीन हसबनिस वरीष्ठ पोलीस निरीक्षक डेक्कन पोलीस ठाणे पुणे यांना फोनव्दारे सदरची माहीती कळवुन महेश भोसले यांनी संबंधीत स्टाफला सदरची माहिती देवून सदर ठिकाणी कारवाई करणरेकरीता स्टाफ व पंचासह जावुन तेथे बसलेल्या इसमांना सदर ठिकाणी का हजर आहात याबाबत विचारणा केली असता त्यांनी असमाधानकारक व उडवाउडवीची उत्तरे देत असताना त्यातील ३ इसमांनी त्यांचेकडील ब्लेडने अटक टाळण्याचे उददेशाने स्वतःचे पोटावर, हातावर वार करुन घेतले. त्यांना स्टापच्या मदतीने त्यांचे हातातील ब्लेड काढुन घेतले ताब्यात घेतलेल्या इसमांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने घटनास्थळाचे आजुबाजुची पाहणी केली असता जवळच रोडचेकडे एक सुपर कॅरी टर्बो कंपनीचा चार चाकी टॅम्पो एम.एच १४ एच.यु. ४९६८ उभा असल्याचे दिसले. ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव विचारता त्याने आपले नाव १) जसपालसिंग जपानसिंग जुनी वय २० वर्षे, रा. रेल्वे स्टेशनचे बाजुला भारतनगर पिंपरी चिंचवड २) कुलदिपसिंग युवराजसिंग जुनी वय २० वर्षे, रा. गल्ली नं १० पाटील इस्टेट शिवाजीनगर पुणे ३) नसिबसिंग रणजितसिंग दुधानी वय १८ वर्षे रा. हनुमाननगर न्यु बुधवार पेठ सोलापुर ४ ) प्रसादसिंग जलसिंग मोंड, वय १९ वर्षे, रा. रेल्वे स्टेशनचे बाजुला भारतनगर पिंपरी चिंचवड, गौरव शंकर राठोड, वय १९ वर्षे, रा. गोल्डन चौक, आय बिल्डींग, चाकण ता. खेड, जि. पुणे ५) अरुणसिंग चंदाशिंग भोंड रा. पाटील इस्टेट पुणे ( पळुन गेलेला ) यातील आरोपी यांनी इंडसइंड बैंक डेक्कन पुणे येथे जावुन हत्यारांसह लुटमार करणार होते त्यापुर्वीच दरोडयाच्या तयारीत असणा-या आरोपींना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन धारदार कोयते, दोरी, ब्लेड, व लोखंडी कटावणी टेम्पो, हे जप्त करण्यात आले. सदर बाबत पो.उप निरीक्षक यांनी गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा तपास पो. उप-निरीक्षक श्री. दत्तात्रय सावंत करीत आहेत:
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. रितेश कुमार, मा. सह आयुक्त श्री. संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. प्रविण पाटील, मा. पोलीस उपायुक्त श्री. संदिप सिंह गील्ल, श्री. वसंत कुँवर सपोआ विश्रामबाग विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विपीन हसबनिस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक महेश भोसले, दत्तात्रय सावंत, सपोफी चव्हाण सपोफी शिंदे. पो. हवा. निकाळजे, पो हवा बोरसे, मपोहवा सुपेकर, पो.ना. गायकवाड, पोलीस अंमलदार येळे, गोफणे भांग तरंगे, तांबे गायकवाड बागुले, बडगे, पाथरुट, काळे, जाधव या पथकाने केलेली आहे….

