वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे दिनांक 24 ऑगस्ट:- प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती अंतर्गत पोलीस मित्र शाखेचे उद्घाटन समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री विजयकुमार वसंतराव पाटील तसेच वंचित बहुजन महिला आघाडी पुणे शहर अध्यक्ष सौ. अनिताताई भीमराव चव्हाण यांच्या हस्ते कलवड लोहगाव या भागात पार पाडण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती समितीचे पुणे शहर अध्यक्ष संदीप नाना कुंबरे, विभाग प्रमुख प्रतिभाताई संदीप कांबळे, समितीचे विशेष पोलीस अधिकारी अमोल कानू, अमित डांगे, संतोष चव्हाण, संदीप कांबळे, राकेश गायमुक्ते, रामदास कांबळे, सचिन माने तसेच वंचित बहुजन महिला आघाडी महासचिव सारिका फडतरे, सामाजिक कार्यकर्ते उद्धवराव जाधव, श्रीमंतराव गायकवाड, माने गुरुजी, श्रीनिवास हजारे, टिंगरे नगर लाईट हाऊसचे सोपान महाजन सर तसेच कलवड भागातील पोलीस मित्र संघटनेचे सर्व शाखा पदाधिकारी व महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांकडून सर्व कार्यकर्त्यांना पोलीस मित्राची जबाबदारी व कर्तव्य याची माहिती देण्यात आली तसेच संस्थेचे ओळखपत्र व जॅकेट वाटप करण्यात आले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

