✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा दि.२५ ऑगस्ट:- रोजी पोलीस मुख्यालय येथील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे वर्धा जिल्हा पोलीस दल व ईला हायरिंग टेक्नोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमानाने पोलीस पाल्यांकरीता, सेवानिवृत्त पोलीसांच्या पाल्यांकरीता, गृहरक्षकांच्या पाल्यांकरीता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन कार्यक्रमांचे प्रमुख अतिथी रामदास तडस, खासदार, लोकसभा वर्धा जिल्हा मतदारसंघ, वर्धा यांचे हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक वर्धा नूरुल हसन व उपाध्यक्ष डॉ. सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, ईला हायरिंग टेक्नोलॉजीचे संचालक अंकित हिवरे यांचे उपस्थीत करण्यात आले.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये उमेदवारांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला. वर्धा जिल्हा नागपूर जिल्हयातील नामांकीत कंपन्या स्टेट बॅंक ऑफ इंडीया, इरॉस हयुदई, ॲबको कॉम्पुटर, आरोही इंन्फो, वी-फलायओरीयस टेक्नोलॉजी, एलआयसी, पटेल एंडस्कील फाउंडेशन, धूत ट्रांसमिशन, ईला हायरिंग टेक्नोलॉजी इत्यांदी उमेदवारांचे साक्षात्कार घेवून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली.
या कार्यक्रमाअंती नूरुल हसन यांनी निवड झालेल्या एकुण ८० उमेदवारांची या रोजगार मेळाव्यादरम्यान विविध कंपन्यांद्वारे निवड झालेली असून २८ उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप केल्या गेले व इतर ५२ उमेदवार यांची अंतिम निवड कंपनीचे संचालकाकडुन होणाऱ्या मुलाखाती करीता राखुन ठेवण्यात आलेली आहे.
ज्या उमेदवारांची काही कारणास्तव निवड होवू शकली नाही अश्यांना सुध्दा आजचा अनूभव गाठीशी ठेवून पुनश्च नवीन जोमाने व हिम्मतीने तयारी करण्याकरीता नूरुल हसन यांनी प्रोत्साहीत केले.
‘‘वर्धा जिल्हा पोलीसांचे पाल्याकरीता असा रोजगार मेळावा घेण्यात आल्याची ही प्रथमच वेळ असून असा रोजगार मेळावा दरवर्षी व्हावा अशी मागणी पोलीस विभागातील परिवारांकडून होत आहे. पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे पाल्यांना नोकरी मिळाल्यास ते सुध्दा निश्चिंत होवून आपले शासकीय कर्तव्य चांगल्या प्रकारे करू शकतात.’’ असे मनोगत पोलीस अधीक्षक नूरूल हसन यांनी पत्रकारांसोबत बोलतांना व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे यशस्वीते करीता राखीव पोलीस निरीक्षक श्री कमलाकर घोटेकर, सपोनि. संदिप कापडे व कर्मचारी सायबर शाखा, वर्धा, सपोनि. श्री लक्ष्मण लोकरे, व कर्मचारी पोलीस कल्याण शाखा, वर्धा यांनी प्रयत्न केले. रोजगार मेळाव्या करीता उपरोक्त कंपनीचे प्रतिनिधी व एकुण ३०३ उमेदवार यांनी उपस्थीती नोंदविली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

